Advertisement

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिवस म्हणुन उत्साहात साजरी


आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिवस म्हणुन उत्साहात साजरी


कन्हान ग्रामीण पत्रकार संघाने कन्हान , कांद्री नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार केला. 


कन्हान : - कन्हान ग्रामीण पत्रकार संघ व्दारे मंगळवार (दि.६) जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन डोणेकर सभागृहात करण्यात आले .


कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार एन.एस.मालविये , प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी , कन्हान - पिपरी नगरपरिषद नवनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , कांद्री नगर पंचायत नवनियुक्त नगराध्यक्ष सुजित पानतावने , कांद्री नगर पंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे , अधिकारी हरिश्चंद्र ठाकरे , माजी जि.प उपाध्यक्ष शरद डोणेकर , कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी डॉ.वैष्णवी जगताप , सेवानिवृत सुभेदार प्रविण सतदेवे सह आदि मान्यवरांचा हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . सर्व मान्यवरांचे संविधान पुस्तक , वृक्ष व दिनदर्शिका देऊन स्वागत करण्यात आले .


लोकशाही मध्ये देशाचा चौथा स्तंभ म्हणुन वृत्तपत्रांना ओळखले जाते .भारतात वृत्तपत्राचा जन्म १७८० ला जेम्स ऑगस्टस हिकी यांच्या 'बेंगॉल गॅझेट' या पत्राने झाला . त्यानंतर ६ जानेवारी १८३२ दिवशी 'दर्पण' च्या रूपाने पहिले मराठी वृत्तपत्र आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले . तसेच योगायोगाने ६ जानेवारी जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दरवर्षी पत्रकार दिवस म्हणुन साजरा होत असल्याने ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे मागील १६ वर्षापासुन पत्रकार दिवस विविध कार्यक्रमासह थाटात साजरा करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकातुन पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे यांनी उपस्थितांना संबोधित केले .

 

कन्हान - पिपरी नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , कांद्री नगर पंचायत नगराध्यक्ष सुजित पानतावने , कांद्री नगरसेवक चंद्रपाल कश्यप , निकेश मेश्राम , शिवशंकर चकोले , उमेश वाडीभस्मे , धर्मेंद्र उर्फ बंटी सरोदे , सिताराम नाटकर , अतुल हजारे , राकेश लांजेवार , नगरसेविका मीनाक्षी भुते , सविता राऊत , नीतु परते , शुभांगी कुंभलकर , माधुरी मस्के , आरती कोतपल्लीवार , रिता मस्के , संघमित्रा डोंगरे , रोशनी गजभिये , कन्हान नगरसेविका योगिता भलावी , सुषमा चोपकर , नीति तेलोते , पुनम राठी , सुचित्रा माटे , प्रियंका हटवार , आशा माहातो , लता लुंढुरे , रेखा टोहने , मोनिका पौनीकर , नगरसेवक कन्हान प्रशांत पाटिल , शमशेर पुरवले, केतन भिवगडे , शिवशंकर वाकुडकर , रिंकेश चवरे , मनोज कुरडकर , हरिश तिडके , विनोद किरपान , जुबेर सोनु खान , शक्ति पात्रे सह आदी ३९ लोक प्रतिनिधींना प्रमुख मान्यवरांचा हस्ते भारताचे संविधान पुस्तक , वृक्ष व दिनदर्शिका प्रत्येकांना भेट देऊन सत्कार करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय संविधान व कायद्याच्या चौकटीत राहुन पारदर्शक , लोकाभिमुख व विकासाभिमुख कार्यकरित नियोजनबद्ध कामकाजांच्या माध्यमातुन कन्हान , कांद्री शहराचा सर्वांगीण विकासास प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली . मान्यवरांनी पत्रकारांच्या समाजातील योगदानाचे कौतुक करित नवनियुक्त लोक प्रतिनिधींना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . 


तसेच हॉकर्स ऐजंट सुतेश मारबते , श्रीधर केसेट्टी , मोहित वतेकर , प्रशांत गणोरकर , अंकित बर्वे आदींचा सुध्दा संविधान व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन पत्रकार गणेश खोब्रागडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन मोहम्मद शफी शेख यांनी व्यक्त केले .


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे , मार्गदर्शक एन.एस.मालविये सर, अजय त्रिवेदी , कार्याध्यक्ष कमलसिंह यादव , सचिव सुनिल सरोदे , उपाध्यक्ष गणेश खोब्रागडे , सदस्य मोहन रंगारी , ऋृषभ बावनकर , शांताराम जळते , रविंद्र कोचे , निलेश गाढवे , आकाश पंडीतकर , जयंत कुंभलकर , दिनेश नानवटकर , मोहम्मद शफी शेख , वीर सिंग सह आदी पत्रकारांनी सहकार्य केले .

Acharya Balshastri Jambhekar Jayanti celebrated as Journalist Day

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या