मेट्रो कामगाराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खेडी शिवारात ४० वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .
मृतक देवेंद्र हरबाजी उमाडे (वय ४०) हे खेडी गावात कुटुंबासह राहत होते .मागील एका वर्षापासुन नागपुर येथे मेट्रो प्रकल्पामध्ये काम करत होते . त्यांचा पश्चात पत्नी व दोन मुले आहे . मृतकाचे भाऊ महेन्द्र हरबाजी उमाडे (वय ३५) आणि सुनील हरबाजी उमाडे (वय ४६) हे देखील खेडी गावात कुटुबांसह राहतात .
शुक्रवार (दि.१६) जानेवारी रोजी सकाळी ०९:३० वाजता च्या दरम्यान महेंद्र उमाडे घरी असतांना त्यांना मित्र आशिष कापसे यांचा फोन आला . शमशान घाटा समोर नदी काठी असलेल्या शेतात देवेंन्द्र उमाडे ची प्रकृती खराब झाल्याचे सांगण्यात आले . महेंद्र उमाडे दुचाकीने शेताकडे गेले , तेव्हा त्यांना अंकुश नेनदेवजी घरझाडे यांचा शेतात लोकांची गर्दी दिसुन आली . शेतालगत उमराचा झाडाला दोरीच्या साह्याने देवेंद्र उमाडे यांनी गळफास घेतल्याचे दिसुन आले .
घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले , पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे पाठविण्यात आले .
देवेंद्र उमाडे यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली , याबाबत अद्याप स्पष्टता नसुन कन्हान पोलीसांनी महेंद्र उमाडे यांचा तक्रारी वरून मर्ग क्रमांक ०३/२६ कलम १९४ बी.एन.एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


0 टिप्पण्या