Advertisement

येसंबा (नांदगाव) गावात बिबट्याचा हल्ल्यात कारवळ ठार |


येसंबा (नांदगाव) गावात बिबट्याचा हल्ल्यात कारवळ ठार

शेतकऱ्याची ३ वर्षीय गौरव जातीची कारवळ  ठार , ५० हजारांचे नुकसान. 

ग्रामीण भागात बिबट्याचा धुमाकुळ , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील येसंबा गावात पुन्हा एकदा बिबट्याने गोठयात बांधलेल्या ३ वर्षीय गौरव जातीच्या कारवळ गाई वर हल्ला करून ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . घटनेत पशुपालक शेतकरी रामराव केचे यांचे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


शनिवार (दि.३) जानेवारी रोजी सायंकाळी येसंबा (नांदगाव) येथील शेतकरी रामराव काशिराम केचे हे स्वत:ची गौरव जातीचे कारवळ नेहमी प्रमाणे चराई करून गावालगत शेतातील गोठयात बांधुन घरी निघुन गेले . रविवार (दि.४) जानेवारी रोजी सकाळी रामराव केचे शेतातील गोठयात प्राण्याला चारा , पाणी करण्यासाठी गेले असता त्यांना ३ वर्षाची खुट्यात बांधलेली कारवळ मृत अवस्थेत दिसुन आली . पहाटे सकाळी ५ वाजता च्या दरम्यान बिबटयाने शिकार केल्याचे लक्षात आल्याने रामराव केचे यांनी घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली . वन सहायक क्षेत्र अधिकारी एस.एम वासनिक व हंगामी वन मजुर फूलचंद नारनवरे हे पिआरटी चंमु सह घटनास्थळी दाखल झाले . बिबटच्या पायाचे निशाणीनुसार बिबट शेतात येऊन कारवळ गाईचे शिकार करून ठार केल्याचे वन विभागाला लक्षात आले . बिबट्याची शोध मोहीम सुरु केली आणि मृत कारवळचा पंचनामा केला . पशु वैद्यकिय अधिकाऱ्या व्दारे शवविच्छेदन करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला .

A-leopard-killed-a-calf-in-a-leopard-attack-in-Yesamba-(Nandgaon)-village

येसंबा (नांदगाव) शेत शिवारात वाघ , बिबट हल्ल्याच्या सतत होत असलेल्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . शेतात काम करणे , जनावरे चारण्यास सोडणे . रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाल्याने वनविभागाने सर्तक राहण्याचे आव्हाहन केले आहे . पिडीत शेतकरी रामराव केचे यांचे ५० ते ६० हजार रूपयांचा झालेल्या नुकसानाची वन विभागाने तातडीने भरपाई करुन द्यावी आणि बिबट , वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश काकडे , चंद्रशेखर पडोळे , सुत्तम मस्के , नरेश रक्षक में, दिंगाबर ठाकरे, सुरज काळे सह गामस्थ शेतकऱ्यांनी केली आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या