स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कांद्री येथे स्वच्छता मोहीम
कन्हान : - स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नगर पंचायत कांद्री (कन्हान) च्या वतीने मंगळवार (दि.१३) जानेवारी रोजी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. सुजित पानतावणे व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मा.सचिन गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेण्यात आली . सात नंबर नाका, कांद्री येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली . या मोहिमेत नगर पंचायतीचे सन्माननीय नगरसेवक , नगरसेविका , अधिकारी , कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला . रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटविण्यात आला .
यावेळी मुख्याधिकारी सचिन गाढवे , नगराध्यक्ष सुजित पानतावणे , नगरसेवक अतुल हजारे , राकेश लांजेवार , सिताराम नाटकर , बंटी सरोदे , नगरसेविका रिता मस्के , आरती कोतपल्लीवार , संघमित्रा डोंगरे यांच्यासह इतर नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
तसेच लेखाधिकारी हरिचंद्र ठाकरे , स्वच्छता निरीक्षक विनोद मेहरोलिया , संजयकुमार शिंदे व नगर पंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित राहिले . स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी शहरासाठी नागरिकांनी स्वच्छतेत सक्रिय सहभाग घ्यावा , असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या