Advertisement

नांदगावात शेत घरातुन नऊ क्विंटल कापसाची चोरी


नांदगावात शेत घरातुन नऊ क्विंटल कापसाची चोरी


घटना सीसीटीवी कैमऱ्यात कैद , आरोपीचा शोध सुरु


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नांदगाव येथील शेतकरी राजेंद्र रच्छोरे यांचा शेतातील घरातुन अज्ञात चोरट्यांनी १८ बोऱ्या ९ क्विंटल कापुस चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे .


राजेंद्र हिरालाल रच्छोरे वय ३९ वर्ष रा.नांदगाव हे शेती व्यवसाय करतात . नांदगांव येथे त्यांची १२ एकर शेती असुन वृषभ मोदी यांची  १० एकर शेती ठेक्यानी करीत आहे .सध्या शेतात कापुस , तुरीचे पीक घेतले असुन , कापुस काढणे चालु आहे , दहा महिला मजुरांच्या मदतीने कापुस वेचुन तो शेतातील घरात गोळा करुन ठेवण्यात येत होता .


गुरुवार (दि.२५) डिसेंबर रोजी नांदगाव शिवारातील शेतात सकाळी नऊ वाजता पासुन दहा महिला मजुर हे कापूस वेचण्या करीता पाठविले होते व दिवस भर कापूस वेचुन सायंकाळी ६ वाजता १८ बोरे कापुस शेतघरात ठेवण्यात आला आणि घराला कुलुप लाऊन सर्वजण घरी निघुन गेले . शुक्रवार (दि.२६) रोजी सकाळी ९ वाजता च्या दरम्यान राजेंद्र रच्छोरे यांना मजुरांनी  फोन केला व शेतील घरातील दाराचे कुलूप तुटलेले असुन कापुस अस्तव्यस्त पडलेला आहे असे सांगीतले . रविंद्र रच्छोरे यांनी शेतात जावुन पाहणी केली असता शेतातील घरातील दाराचे कुलुप तुटलेले दिसले आणि आत मध्ये ठेवलेल्या १८ बोरे अंदाजे किंमत ५०,४०० रुपयांचा कापुस दिसुन आला नाही . शेत परिसरात इकडे तिकडे शोध घेतला असता कापुस चोरी गेल्याचे स्पष्ट झाले आणि घटनास्थळी लोखंडी ब्लेडही आढळुन आली . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी रविंद्र रच्छोरे यांचा तक्रारी वरून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे  . सदर घटना सीसीटीवी कैमऱ्यात कैद झाली असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या