केडीके कॉन्व्हेंट शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम
कन्हान : - टेकाडी येथील केडीके कॉन्व्हेंट शाळा (केशवराव देवाजी कांबळे) येथे मंगळवार (दि. २३ डिसेंबर) रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटेश कारेमोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक अविनाश कांबळे, भगवानदास यादव, सूर्यभान चकोले, किशोर वासाडे, ऋषभ बावनकर, मनीषा येवले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्व.केशवराव देवाजी कांबळे व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली . विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला शिक्षक , पालक व नागरिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली . कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले .
यावेळी अक्षय भुते, भगवान बावनकुळे, ज्ञानेश्वर कांबळे, राजेश चावके, योगेश्वर राऊत, विशाधर कांबळे, रोशन बाळबुधे, विनोद मोहाडे, धर्मराज उमक, कृणाल मालेवार, सौ. मालेवार, दिपाली मरगडे, कल्याणी राऊत, मनीक्षा कांबळे, सीमा इवनाते, मयुरी बाळबुधे, सीमा भुते आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका निशा देशमुख तसेच मनीक्षा कांबळे, सुरेखा कांबळे, अर्चना कारेमोरे, अर्पणा गजभिये, रीना राम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या