Advertisement

बनपुरी शेत शिवारात वाघाने केली गायीची शिकार


बनपुरी शेत शिवारात वाघाने केली गायीची शिकार 


बनपुरी सह परिसरातील गावकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण


कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील बनपुरी गावातील शेत शिवारात बांधुन असलेली गाभण गायीवर वाघाने हल्ला करुन ठार केले . या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बनपुरी गावच्या शेत शिवारात शेतमालक धनराज मेंघरे यांनी बुधवार रोजी सायंकाळी गाभण गायीला शेतात बांधले आणि चारापणी करुन घरी आले . गुरुवार रोजी सकाळी ७ वाजता च्या दरम्यान धनराज मेंघरे शेतात गेले असता त्यांना गाय बांधलेली दिसुन आली नाही . आजु बाजुच्या परिसरात शोध घेतला असता नाल्याजवळ गाय मृत अवस्थेत दिसुन आली . घटनेची माहिती धनराज मेंघरे यांनी सरपंच नंदलाल बावनकुळे , उपसरपंच रुपेश ढोबळे आणि पोलीस पाटील यांना दिल्याने त्यांनी वनविभागाचे क्षेत्र सहायक एस.एम.वासनिक यांना कळवले .


काही वेळाने वनरक्षक धर्मपाल डोंगरे , गार्ड एस एस नागरगुचे सह पिआरटी टिम घटनास्थळी पोहचुन परिसरातील पाहणी केली व पंचनामा करित साटकचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष तुपट यांना बोलवुन पोस्टमार्टम केले आणि अहवाल तयार करून माहिती वरिष्ठांना पाठविली . बनपुरी शेत शिवार परिसरात वाघ व बिबट्याचा वावर वाढल्याने जवळपासच्या गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या संबंधी वन परिक्षेत्राचे वनरक्षक धर्मपाल डोंगरे व क्षेत्र सहाय्यक अधिकारी एस एम वासनिक आणि पीआरटी टीम यांनी सकाळी ९.३० वाजता गावात आल्यावर बनपुरी गावाचे सरपंच नंदलाल बाबनकुळे , उपसरपंच रुपेश ढोबळे व पोलिस पाटील आणि गावकरी शेतकऱ्यांनी पिढीत शेतकरी धनराज मेंघरे यांची गाभण गाय वाघाने शिकार करून ठार केल्याने अंदाजे ६५ ते ७० हजार रूपयाचे नुकसान झाले . शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देऊन आणि वाघाचा शोध घेऊन जंगलात नेऊन सोडण्याची मागणी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या