Advertisement

कवी विजय वासाडे यांना विदर्भ साहित्य संमेलन (कवी कट्टा) यवतमाळ चे निमंत्रण


कवी विजय वासाडे यांना विदर्भ साहित्य संमेलन (कवी कट्टा) यवतमाळ चे निमंत्रण



कन्हान : - विदर्भ साहित्य संघाचे ६९ वे विदर्भ साहित्य संमेलन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र यवतमाळ येथील जांब नगरीत येत्या एक व दोन नोव्हेंबर २०२५ ला ज्येष्ठ साहित्यिक श्री रमाकांत कोलते सर यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेले आहे .


हे संमेलन भव्यदिव्य स्वरूपाचे असून यामध्ये सगळ्या साहित्यिकांना संधी मिळणार आहे त्या अनुषंगाने कवीकट्टा नावाचा एक वेगळा मंच तयार केला त्यामध्ये विदर्भातील सर्व कवींना विदर्भ साहित्य संमेलना च्या वतीने कविता पाठवण्याचे आवाहन केले होते . वासाडे यांनी सुद्धा कविता पाठवली होती त्या कवितेची कवीकट्ट्या करिता  या संमेलनात "निमंत्रित साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध कवी श्री. विजय वासाडे यांची  निवड झालेली असून विजय वासाडे यांना आपली कविता दिनांक ०१/११/२५ रोजी २.०० ते.६.३० ह्या दरम्यान सादर करायची आहे .

Poet Vijay Vasade invited to Vidarbha Sahitya Sammelan (Kavi Katta) Yavatmal

विजय वासाडे हे संवेदनशील कवी  म्हणून सुपरिचित असून  व्यवसायाने शेतकरी असून  नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टेकाडी(को. ख.) गावाचे रहिवासी आहेत . त्यांच्या या निवडीमुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावं होत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या