Advertisement

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक - महिलेचा जागीच मृत्यू-तिघे गंभीर जखमी


दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक -  महिलेचा जागीच मृत्यू-तिघे गंभीर जखमी 


दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक

  *महिलेचा जागीच मृत्यू,  तिघे गंभीर जखमी                         

    पारशिवनी तालुक्यातील महादूला या गावाजवळ महादूला-पारशिवनी रस्त्यावर (दि.३१ ऑक्टोबर) दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर तिघे गंभीररित्या जखमी झाले. 

 या अपघातात आमडी (ता.पारशिवनी) येथील महिला राईबाई उमराव मेश्राम (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा महेंद्र उमराव मेश्राम   (वय ३२) गंभीर जखमी झाला आहे. तसेच  ज्योसना हरीश मते (वय २१) रा. नागपूर आणि अमोल संजय राठोड             (वय ३० रा. इटगाव ता.पारशिवनी) हे दोघेही जखमी झाले आहेत. 

ती बाई आपल्या मुलासह  महादुला येथे काही कामानिमित्त गेली होती, आमडी(ता.पारशीवनी) या आपल्या राहत्या गावी परत येतांनी ही घटना महादूला-पारशीवनी मार्गावर त्यांच्या एमएच-४०बीव्ही-८६९९ क्रमांकाच्या दुचाकीला इटगाव कडून येणाऱ्या एमएच-४०/सीपी-६६५४ या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. 

यात राईबाई उमराव मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, या घटनेनंतर मृत महिलेचा दुसरा मुलगा मंगेश उमराव मेश्राम यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वार अमोल संजय राठोड यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहेत.

Two bikes collide head-on

 पारशिवनी तालुका प्रतिनिधी- अनिल गजभिये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या