पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस पाटलांचा पुढाकार
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटलांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे .
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक वाहून गेल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे . या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांना मदत म्हणून कन्हान येथील पोलीस पाटलांनी एक दिवसाचे मानधन शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला .
शुक्रवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी सर्व पोलीस पाटलांनी या निर्णयाबाबतचे पत्र पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना सादर केले असून ते शासनाला पाठविण्यात आले आहे .
या वेळी पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्हा चे सहसचिव गुंडेराव चकोले, अध्यक्ष लोमेश्वर गडे, उपाध्यक्ष अजय ईखार, सचिव नरेंद्र राऊत यांच्यासह पुंडलिक कुरडकर, संदीप नेऊल, संतोष ठाकरे, संजय नेवारे, अरविंद गजभिए, संदीप भोले, चक्रधर वासनिक, प्रदीप ऊके अरविंद गजभिए, संदीप भोले, चक्रधर वासनिक, प्रदीप ऊके, योगेश नांदुरकर, राहुल कालबेले, कृणाल ब्राम्हणे, निखिल बागडे, कैलाश कारेमोरे, कांचन मस्के, शालु हरडे, सोनु गेडाम, विकास हटवार, शुभम बल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या