Advertisement

कन्हान व टेकाडी–गोंडेगाव सर्कल परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


कन्हान व टेकाडी–गोंडेगाव सर्कल परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी. - माजी जि.प सदस्य कारेमोरे


कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील कन्हान , टेकाडी आणि गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये झालेल्या जोरदार वादळ, वाऱ्या सह पावसाच्या अवकाळी अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान , मिरची , कापुस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी पारशिवनी नायब तहसीलदार रमेश पागोटे मार्फत शासनाला निवेदन देऊन केली आहे . 


बुधवार (दि.२९) ऑक्टोंबर रोजी माजी जि.प सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांनी तहसीलदार पारशिवनी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यासह भेट देऊन (दि. २५) व ( दि. २९ ते ३०) च्या मध्यरात्री कन्हान व परिसरातील जि.प टेकाडी व गोंडेगाव सर्कल मध्ये जोरदार वादळ , वाऱ्या सह पावसाच्या अवकाळी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान , मिरची , कापुस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले . 

प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे पंचनामे करून योग्य अहवाल शासनाकडे पाठवुन शासना कडुन योग्य आर्थिक मदत मिळवुन देण्यास मदत करावी . अशी मागणी नायब तहसीलदार रमेश पागोटे यांच्या मार्फत माजी जि.प सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांनी शासनाला निवेदन पाठवुन केली आहे .यावेळी डुलीचंद झाडे , धनराज चकोले , शिवराम धावडे , रामचंद चकोले सह इतर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते .

Heavy rains in Kanhan and Tekadi-Gondegaon circle areas cause huge losses to farmers

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या