Advertisement

डॉ संपदा मंडे आत्महत्या प्रकरणी दोषीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी |



डॉ संपदा मंडे आत्महत्या प्रकरणी दोषीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी


उबाठा पक्ष जिल्हा महिला आघाडी व्दारे कन्हान पोलीस निरीक्षक मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन  


कन्हान : - सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व त्यामध्ये झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभुमिवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला जिल्हा संघटिका दुर्गा विजय कोचे आणि सर्व महिला आघाडी व्दारे करण्यात आली.


निवेदनात सांगितले कि , फलटण उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असुन मृत्यूपूर्वी त्यांनी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मज कुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्या वर बलात्कार केला व प्रशांत बनकर आणि इतरांकडुन मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत . तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल महाडिक व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही त्या तक्रारींकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करण्यात आले . त्यामुळे महिलांसंबंधी गुन्हे रोखण्याची आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे ही कायदा - सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब असुन राज्य प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारी घटना आहे , असे निवेदनात सांगितले आहे .

Demand for strict punishment for the culprit in Dr. Sampada Mande suicide case

सदर प्रकरणात आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजित नाईक , निंबालकर व त्यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचे आल्याचा आरोप असल्याने राज्याची सत्ता व अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे गैरवापर होणे हे संविधान व कायद्याच्या , शासनाच्या संकल्पनेशी विसंगत आहे . त्यामुळे सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व त्यामध्ये झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभुमिवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे . यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटिका दुर्गा कोचे , शारदा शेंडे , पुष्पा गावंडे सह महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या