क्रांतीवीर वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांना वाहिली श्रद्धांजली
कन्हान : - बिरसा मुंडा गोंडवाना संघर्ष समिति कन्हान द्वारे क्रांतीवीर वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांचा बलिदान दिवस निमित्य श्रद्धांजली वाहण्यात आली .
मंगळवार (दि.२१) आॅक्टोंबर रोजी क्रांतीवीर वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांचा बलीदान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शंकर इनवाते , प्रमुख अतिथी नगरसेविका राखीताई परते, प्रविण गोडे, अभिजित चांदुरकर यांच्या हस्ते वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि जय सेवा जय गोंडवाना चा जयघोष करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
यावेळी माजी नगरसेविका राखी परते , मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शंकर इनवाते यांनी वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व नागरिकांनी वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन पाळुन श्रद्धांजलि वाहण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप परते यांनी केले आणि आभार प्रदर्शन राहूल टेकाम यांनी केले . या प्रसंगी नवल धुर्वे , विकास धुर्वे , राजु खंडाते , ब्रिजलाल टेकाम , नितीन उईके , रविंद्र इनवाते , वसंतराव धुर्वे , रविंद्र वरखडे , शुभम उईके , नितेश लांजेवार सह आदि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या