Advertisement

पारशिवनी तहसील कार्यालय द्नवारे वनियुक्त समन्वय समिती, संजय गांधी निराधार समिती, दक्षता समिती च्या अध्यक्ष व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले


पारशिवनी तहसील कार्यालय अंतर्गत नवनियुक्त समन्वय समिती, संजय गांधी निराधार समिती, दक्षता समितीच्या अध्यक्ष व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले

दिनांक ६/१०/२०२५ ला पारशिवनी तहसील कार्यालय अंतर्गत  तहसील कार्यालय सभागृह मध्ये नवनियुक्त समन्वय समिती, संजय गांधी निराधार  समिती, दक्षता समिती, या तीन्ही समितीच्या अध्यक्ष व नवनियुक्त सदस्यांना तहसील कार्यालयात बोलावून मा.तहसीलदार सुरेश वाघचैरे यांच्या हस्ते सर्व अध्यक्ष व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार पारशिवनी यांनी परिचय करून दिले. 

याप्रसंगी नियोजन समितीचे अध्यक्ष श्री राजेश गोमकाळे, दक्षता समितीचे अध्यक्ष दिपक शिवरकर, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष राजू भोस्कर उपस्थित सदस्य व अधिकारी यांना संबोधन करतांना म्हटलं की लोकसेवेचे कार्य सुव्यवस्थीत आणि सुरळीत चालण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांनी कर्मचारी व अधिकारीचा खानद्यालाखानदा मिळून कार्य करण्याची हमी यावेळी देण्यात आली.

स्वागत समारंभ व अध्यक्ष, सदस्य व कर्मचारी परीचय चा कार्यक्रमाला उपस्थित नियोजन समितीचे अध्यक्ष राजेश गोमकाळे व सर्व सदस्य, दक्षता समिती चे अध्यक्ष दीपक शिवरकर व .सर्व सदस्य, संजय समितीचे अध्यक्ष राजु  भोस्कर  व सर्व सदस्य, मा.तहसीलदार सुरेश वाघचैरे ,गट विकास अधिकारी  पारशिवनी सुभाषजी जाधव, नायब तहसीलदार मिश्रा ,तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कन्हान, पारशिवनी येथील पोलीस अधिकारी, तालुका पाटबंधारे विभागातील अधिकारी, तालुका पीडब्ल्यूडी अधिकारी अल्लेवार , अन्न व पुरवठा विभागातील अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

The-newly-appointed-Coordination-Committee-Sanjay-Gandhi-Niradhar-Committee-Vigilance-Committee-and-the-newly-appointed-members-were-felicitated-with-bouquets-under-the-Parshivni-Tehsil-Office

The newly appointed Coordination Committee, Sanjay Gandhi Niradhar Committee, Vigilance Committee and the newly appointed members were felicitated with bouquets under the Parshivni Tehsil Office.

मुख्य संपादक: भारत पगारे-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या