Advertisement

वीरांगना दुर्गावती मडावी यांची जयंती उत्साहात साजरी


वीरांगना दुर्गावती मडावी यांची जयंती उत्साहात साजरी

कन्हान : - बिरसा मुंडा आदिवासी गोंडवाना संघर्ष समिती कन्हान द्वारे महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी यांचा ५०१ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन बोरडा येथे करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर इनवाते , प्रमुख अतिथि बोरडा ग्रामपंचायत सदस्य रामराव बंड , नवलसिग धुर्वे , गगन सिरसाम  नरेश धुर्वे , रविंद्र वरखडे , शुभम उईके सह आदि मान्यवरांचा हस्ते महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मान्यवरांनी वीरांगना दुर्गावती मडावी यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी 

वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन  विनम्र अभिवादन कले . अल्पोपहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाची प्रस्तावना राहुल टेकाम यांनी मांडली , सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन संदीप परते यांनी केले  .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजक महाराणी दुर्गावती मडावी आदिवासी गोंडवाना समिती बोरडा चे अध्यक्ष  परमेश्वर उइके उपाध्यक्ष विष्णू कोडवते , सदस्य इंद्रपाल इरपाते , रामेश्वर खुद्दयाम , समीर टेकाम , तुषार वाडव ,अर्जुन कोडवते,सुरेश उईक , अनिकेत टेकाम , रितिक अमृत , सनम दादुरे , गुणवंत अमृते ,  विकी महादुले , विकी दादुरे सह आदि आदिवासी समाज उपस्थित होते .

The birth anniversary of heroine Durgavati Madavi is celebrated with enthusiasm.

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या