Advertisement

बलीप्रतिपदेला महासम्राट बळीराजा उत्सव कन्हान येथे थाटात साजरा


बलीप्रतिपदेला महासम्राट बळीराजा उत्सव कन्हान येथे थाटात साजरा


कन्हान : - मराठा सेवा संघ कन्हान व्दारे बलीप्रतिपदे ला भारतीय सिंधु (शिव) संस्कृतिचा महानायक "महासम्राट बळीराजा " यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून आपल्या महासम्राट राजा विषयी मार्गदर्शन व अल्पोहार वितरण करुन सामुहिक महासम्राट बळीराजा उत्सव थाटात साजरा करण्यात आला .


बुधवार (दि.२२) रोजी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेला मराठा सेवा संघ कन्हान व्दारे भारतीय सिंधु (शिव) संस्कृतिचा महानायक "महान सम्राट बळीराजा " यांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक राजेंद्र शेंदरे , सामाजिक कार्यकर्ते नेवालाल पात्रे , सेवा निवृत्त सैनिक प्रविण सतदेवे , जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा मायाताई इंगोले , सुनंदाताई दिवटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित व पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून मॉ राजमाता जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 

याप्रसंगी महासम्राट बळीराजा फक्त कृषी/शेत करी नव्हे तर व्यापार , तंत्रज्ञान , विज्ञान , कला , युद्धनीती , संस्कृती समृद्ध करणारा समस्त भारतीयांचा कुळ स्वामी , महानायक , समतावादी , रक्षक , प्रजाहितदक्ष , स्वामी तिन्ही जगाचा , महादानशुर , महाबली , अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट बळीराजाच्या विशाल साम्राज्याची राजधानी- महाबलिपुर (तामिळनाडु) असुन सरसेनापती खंडोबा , ज्योतीबा , म्हसोबा , काळभैरव , मल्हारी , बिरोबा , मार्तंड , भैरोबा भराडी हे होते . " माझी प्रजा उपाशी राहु नये , अन्नदाता सुखी भवः,इडा पिडा टळो' म्हणुन सतत काळजी घेणारा . 

इतका जीवलग की सात काळजाच्या आत कायम जपुन ठेवावा . म्हणुनच 'इडा पिडा टळो, बळीराज्य येवो , असे सुमारे ३००० वर्षापासुन समस्त भारतीय त्याच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करित आहेत . यास्तव राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामुहिक बळीराजा उत्सव दिवाळीच्या बलीप्रतिपदेच्या दिवसी घरोघरी व सामुहिक उत्साहाने साजरा करण्यात येत आहे . असे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक शांताराम जळते यांनी केले आणि आभार प्रदर्शन मोतीराम रहाटे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता लताताई जळते , रंजना इंगोले , वसंतराव इंगोले , विठ्ठल मानकर , नामदेव नवघरे , बबनराव इंगोले ,कमल सिह यादव , राजेंद्र गाढवे , योगराज अवसरे , भगवान कडु , राजेश गुडधे , दिपक उघडे , संजय चंहादे , क्रिष्णा मदन , विजुभाऊ बारके , नरेश घरडे , विशाधर कांबळे , यश रहाटे आदीनी सहकार्य केले.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या