Advertisement

२००५ च्या बॅचचे धर्मराज विद्यालय, कन्हान येथे विद्यार्थी पुनर्मिलन सोहळा |


२००५ च्या बॅचचे धर्मराज विद्यालय, कन्हान येथे विद्यार्थी पुनर्मिलन सोहळा

कन्हान : - धर्मराज विद्यालय कन्हान येथे इ.१० वी च्या २००५ च्या बॅच तर्फे रीयुनियन (विद्यार्थी पुनर्मिलन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . दोन दशकांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचा सोहळा साजरा केला .


या प्रसंगी त्या बॅचचे मुख्याध्यापक झोड सर , तसेच वासनिक मॅडम , डुकरे सर , निकोसे सर , भेलकर सर , केवटे सर , मंगर सर आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता .


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शिक्षक स्वागत समारंभाने झाली . त्यानंतर शिक्षकांचा सत्कार , मनोगत व विद्यार्थ्यांचा पुनःपरिचय सत्र पार पडले . २० वर्षांनंतर शाळेत पाऊल टाकताच सर्व विद्यार्थी आठवणींच्या दुनियेत रममाण झाले .


शाळेच्या मैदानावर ‘सावधान - विश्रांती’च्या तालावर पुन्हा विद्यार्थी जीवनाचा अनुभव घेत ‘जन गण मन’ राष्ट्रगीत सादर करण्यात आले . वर्गात प्रवेश करताच गुरुजींनी छडीचा प्रसाद देऊन जुन्या आठवणी ताज्या केल्या . हजेरी घेताच क्षणभरासाठी पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचा भाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता .


यानंतर विद्यार्थ्यांनी कबड्डी व खो-खो खेळांचा आनंद घेतला . कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना आठवणींचे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .


या वेळी विद्यार्थ्यांनी ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमाअंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षात शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने मदत करण्याचा संकल्प केला.


कार्यक्रमात जुन्या आठवणींनी प्रत्येकाचे डोळे पाणावले . “हा दिवस आयुष्यभर लक्षात राहील , कारण पुन्हा एकदा आम्ही शाळकरी झालो ,” असे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले .


या पुनर्मिलन कार्यक्रमात माजी विद्यार्थी सुनील खरबडे , उज्वल पवार , आशिष मदनकर , अमित मेंघरे , राहुल बोरकुटे , प्रितीश हटवार , योगेश मुळे , सेवक भोयर , राहुल चलपे , भूषण डांगे , आदित्य ठवकर , आशिष कोहळे , आशिष नागपूरे , निलेश वाघमारे , बबलू गीर्हे , राहुल निर्वाण , मंगेश भोन्डे , महेश भोगे , धीरज दोडके , राहुल भोंगडे , आशिष वाधंकर , निलेश गेडाम , अतिश चिखले , अमित कुंभलकर , गौरव देशमुख , राकेश वाडीभस्मे , रवी सावरकर , अशोक गीर्हे , निलेश लुहुरे , प्रविण रंगारी , गणेश किरपान , राहुल अंजनकर , योगेश ठाकरे , अतुल तागडे , चैतन्य राऊत , प्रशांत भलावी , विनोद लोंढेकर , बलदेव कुंभलकर , देवेंद्र नाकतोडे , पंकज वांजारी , निर्णय कुंभलकर , मोनीश निकोसे , प्रतीक टाकळखेडे , विजय केणे , नितेश मेष्राम , पवन कऱेमोरे , तसेच विद्यार्थिनी सरोज वानखेडे , मीना नेवारे , राजश्री जलिट , मनीषा सरोदे , ज्योत्सना ठाकरे , रिनी भेलावे , सोनू तिवाडे , राजश्री फुटाणे , पल्लवी वाघमारे , आरती भालेराव , सुचिता धुमटकर , प्रीती वैरागडे , दिक्षिता मेष्राम , मयुरी मरघडे , अश्विनी हिवरकर , प्रिया चरडे , पपीता पारधी , लक्ष्मी थुटे , ईश्वरी चौधरी , सोनू करंडे , रीता गायकवाड , तपस्या वाघमारे , माधुरी पाखले आदी उपस्थित होते .

Student reunion ceremony of the batch of 2005 at Dharmaraj Vidyalaya, Kanhan

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या