पाली उमरी येथील रोगनिदान शिबिराला प्रतिसाद
पारशिवनी- गट ग्रापं. उमरी पाली येथे रोगनिदान शिबिर पार पडले. गरजुनां आरोग्य तपासणी व औषध वितरण करण्यात आले. १३०रुग्ण तपासणी व१०६रुग्णानां विनामूल्य औषधी देण्यात आली. शिबिराचे आयोजन विनोदय मल्टीपरपज सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे तज्ञांच्या मार्गदर्शनात सिस्टर आशारीत, मनिष, दक्ष, यांनी रुग्णाची तपासणी केली. व औषधी वितरण करण्यात आले.
स्थानिक पातळीवर पाले उमरी येथील सरपंच- शुभम राऊत, उपसरपंच- निकिता भूपेंद्र खोब्रागडे,उपस्थित पाटील- प्रल्हाद उरकुंडे, सुरेश केवट, प्रेमलता शेंद्रे, नरेंद्र भिमटे व गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
Response to the diagnostic camp at Pali Umri
पुढाकार प्रतिनिधी- डाॅ.पुनादास गजभिये.
0 टिप्पण्या