कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या दहा प्रभागांसाठी आरक्षण जाहीर
नगराध्यक्षपद नामाप्रसाठी राखीव , निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग
कन्हान : - कन्हान - पिपरी नगर परिषद प्रशासनाने बुधवार (दि.८) आॅक्टोंबर रोजी आगामी निवडणुकीसाठी १० प्रभागांचे आरक्षण जाहीर केले असुन निवडणुकीत नगराध्यक्ष पद नागरिकांच्या नामाप्रसाठी राखीव करण्यात आले आहे . या नगर परिषदेत मतदारांना १० प्रभागा मधुन एकुण २० नगरसेवक निवडुण द्यायचे असुन, नगराध्यक्षाची निवड थेट मतदारा मधुन होणार असल्याने नगर परिषदेला एकुण २१ लोकप्रतिनिधि मिळणार आहे .
लोकसंख्येचा आधारावर प्रभाग रचना करण्यात आली असुन दहा प्रभागा मध्ये एकुण लोकसंख्या २७ हजार ८५१ इतकी आहे . यात अनुसूचित जातीची अ.जा.लोकसंख्या १०५७५ , अनुसूचित जामाती अ.जा.लोकसंख्या ११०९ असुन या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली आणि लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण जाहीर करण्यात आले .
लोकसंख्या २७८५१
अनुसूचित जाति १०५७५
अनुसूचित जमाती ११०९
एकुण सदस्यांची संख्या २०
दोन सदस्य प्रभावी संख्या १०
एकुण प्रभागाची संख्या १०
प्रभाग निहाय असे
प्रभाग क्रमांक १. अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक २. अनुसूचित जाती व ओबीसी महिला ,
प्रभाग क्रमांक ३. अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक ४. अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक ५. अनुसूचित जाती महिला व ओबीसी ,
प्रभाग क्रमांक ६. अनुसूचित जाती व ओबीसी महिला ,
प्रभाग क्रमांक.७. अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक.८ अनुसूचित जाती महिला व ओबीसी ,
प्रभाग क्रमांक ९. ओबीसी महिला व सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक १०. अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केला आहे .
आरणक्ष जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आले असुन संभाव्य उम्मेदवारांचे जनसंपर्क सुरु झाले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या