बोरगाव- बर्डीपाडा मार्गवर खड्डेच - खड्डे
बोरगाव- बर्डीपाडा मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठयाप्रमाणात नुकसान होत आहे.
महाराष्ट्र- गुजरात ला जोडणारा हा मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. कळवण व नाशिक या मार्गे गुजरात कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यात वाहने आदळतात. वाहनांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. तसेच सुरगाणा हट्टी फाट्याच्या पुढे रस्त्याची देखील मोठया प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर इतर ठिकाणीही खड्डे पडले आहेत.
या खड्यांमुळे अपघाताच्याही घटना घडत आहेत. खड्डे इतके आहेत की, त्यामधून मार्ग काढणेही दुचाकी चालकांना शक्य होत नाही. दरम्यान, खड्ड्यात दुचाकी आदळून दुचाकीचालक अक्षरशः कोलमडून रस्त्यावर पडतात. यामध्ये वाहन चालक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
‘‘या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सुरगाणा, उमरेमाळ या भागात तर रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी वाहन चालक तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी - किशोर जाधव, सुरगाणा नाशिक
0 टिप्पण्या