Advertisement

दारूच्या नशेत चुलत भावाचा खून


दारूच्या नशेत चुलत भावाचा खून 

पारशिवनीतील करंभाड या गावातील घटना: आरोपीस अटक 

करंभाड गावात चुलत भावाने डोक्यात जाड वस्तुने प्रहार करून भावाचा जीव घेतला. यावेळी आरोपी व मृतक दारूच्या नशेत होते. गोलू उर्फ प्रशांत लोहकरे (३५) रा. करंभाड असे मृतकाचे नाव आहे.  आरोपी विनोद पांडुरंग लोहकरे (५२) रा. करंभाड याला पोलिसांनी अटक केली.

Murder of cousin under the influence of alcohol

       प्रशांत व विनोद रात्री ९ च्या सुमारास दारूच्या नशेत होते. तेव्हा दोघात वाद झाला, आरोपी विनोद लोहकरे ने प्रशांत लोहकरे यांच्या डोक्यावर व छातीवर वस्तुने प्रहार केले, या हल्ल्यात प्रशांत जखमी झाला. उपचारादरम्यान काल सोमवारी (दि.१३) त्याचा मृत्यू झाला. राजकुमार लोहकरे (५६) यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक रामराव पवार व वीरेंद्रसिंह चौधरी करत आहेत.

पुढाकार प्रतिनिधी- अनिल गजभिये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या