जुनी कामठीत कोजागिरी पौर्णिमा उत्साहात
कन्हान : - परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ शाखा जुनी कामठी द्वारे गावात बुधवार रोजी कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंद कुमरे , मार्गदर्शक दामुजी मोहतुरे यांच्या हस्ते भगवान बाबा हनुमानजी , महानत्यागी बाबा जुमदेवजी , मातोश्री आई वाराणसी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या . दुध वितरण आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रमाने कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन नाना ऊकेकर यांनी केले . या प्रसंगी अर्जुन बावणे , बापूराव उके , चिंतामण शेंडे , नरेश वैले , भगवान उके , तुलसीराम बावणे , विट्टल उके , मारोती सहारे , शांताबाई उके , योगिता बावणे , सुशीला मेश्राम , प्रतिमा बावणे , दीपा उके , अंतकला वैले , सुशीला भोयर , कुमरे बाई सह आदि सेवक , सेविका , नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Kojagiri Pournima in Old Kamathit with enthusiasm
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या