कन्हान येथे आजपासुन तीन दिवसीय ‘भीम-महोत्सव’
कन्हान : - रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , कन्हान येथे आजपासुन तीन दिवसीय ‘भीम-महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहे . या कार्यक्रमाची सुरुवात आज शुक्रवार (दि.३१) ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादनाने होणार आहे .
![]() |
| Advertising from pudhakar samachar |
महोत्सवाचे उद्घाटन महाबोधी महाविहारचे प्रणेते भंते विनाचार्य यांच्या हस्ते होईल . उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे , प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिलशील नाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विकास राजा , लता किरण , खलील शहाजाद , क्रांती विनल , सूरज आतिश , राणी तबसून , सूर्यकांत पाटील आणि सुभाषराव कोठारे यांची भीम - बुद्धगीतं आणि कव्वालीमय संगीतप्रबोधनाची मैफल रंगणार आहे . शनिवार (दि.१)नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रियदर्शन सोनटक्के यांचा “जयभीम वाल्याची शान निळा झेंडा” हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम होईल .
रविवार (दि.२) नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पासुन ते रात्री १०.०० वाजता पर्यंत शाहीर पुरुषोत्तम खांडेकर , शाहीर मिनाद बागळे आणि शाहीर निशांत सुखदेवे यांच्या सहभागाने लोकशाहीरांचा राष्ट्रीय भीम शाहिबाना जलसा रंगणार आहे .
रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर





0 टिप्पण्या