Advertisement

गुरुकुंज मोझरीहून महासम्राट बळीराजा रथयात्रेचा भक्तिमय आणि उत्साही प्रारंभ; शिवतीर्थ उमरी येथे पूर्वतयारी संपन्न


गुरुकुंज मोझरीहून महासम्राट बळीराजा रथयात्रेचा भक्तिमय आणि उत्साही प्रारंभ; शिवतीर्थ उमरी येथे पूर्वतयारी संपन्न 

सावनेर: सावनेर परिसरात सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाणारी 'महासम्राट बळीराजा रथयात्रा' दिनांक ११ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी ते शिवतीर्थ उमरी या मार्गावर अत्यंत भक्तीमय वातावरणात ही रथयात्रा दणक्यात पार पडणार आहे.

या यात्रेच्या औपचारिक प्रस्थानाची आणि पूर्वतयारीची सांगता आज, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी शिवतीर्थ उमरी (भ) येथून करण्यात आली. दुपारी १:३० वाजता शिवतीर्थ टुरिझम कार्यालय परिसरातून रथाचे औपचारिक प्रस्थान झाले. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात रथाची सुशोभित मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी आयोजक समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळीराजा रथयात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी आहे. या रथयात्रेच्या मुख्य कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, सांस्कृतिक उपक्रम आणि समाजोपयोगी कार्यांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

पुढाकार २४ तास अशोक काळबांडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या