Advertisement

धर्मराज प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी उघडले कांद्रीचे राजकीय भवितव्य


धर्मराज प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी उघडले कांद्रीचे राजकीय भवितव्य


कन्हान : - कांद्री नगरपंचायत येथे १७ सदस्यीय प्रभाग पध्दतीचे आरक्षण सोडत पिठासीन अधिकारी आणि रामटेक उपविभागीय अधिकारी मा.प्रियेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कांद्री नगर पंचायतचे मुख्याधिकारी सचिन गाढवे , वरिष्ठ लेखापाल हरिश्चंद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली .

Children of Dharmaraj Primary School reveal the political future of Kandri

या आरक्षण सोडतीसाठी प्रथमच धर्मराज प्राथमिक शाळा , कांद्री - कन्हान व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , कांद्री च्या विद्यार्थ्यांना मान मिळाला . या सोडतीत धर्मराज प्राथमिक शाळेतील कु.सावी डांगरे , कु. प्रियांशी हेडाऊ , कु.इशिता खांदारे , प्रांशुल लोणकर , रौनक वंजारी यांनी तर जिल्हा परिषद शाळेतील हर्षल मेश्राम , अर्नव चिन्नुरकर , कु.नव्या शिंगारकर यांनी सहभाग घेतला होता . 


राजकीय पटलावर प्रथमच मान मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता . सर्व विद्यार्थ्यांचे पिठासीन अधिकारी व रामटेक उपविभागीय अधिकारी मा. प्रियेश महाजन व मुख्याधिकारी सचिन गाढवे यांनी कौतुक केले व निवडणुक इतिवृत्तात या विद्यार्थ्यांचे नाव समाविष्ट होईल असे सांगितले . यावेळी विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक खिमेश बढिये , कु.शारदा समरीत व कु.अर्पणा बावनकुळे उपस्थित होते .

Children-of-Dharmaraj-Primary-School-reveal-the-political-future-of-Kandri

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या