Advertisement

आरोग्य रोननिदान शिबीराचा २०६ नागरिकांना लाभ


आरोग्य रोननिदान शिबीराचा २०६ नागरिकांना लाभ


कन्हान : - कन्हान शहर विकास मंच आणि सह्याद्री संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने खदान नंबर सहा येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबाराचा २०६ नागरिकांनी लाभ घेतला .


बुधवार (दि.८) आॅक्टोंबर रोजी  

कन्हान शहर विकास मंच आणि सह्याद्री संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने खदान नंबर सहा येथे शिव मंदिर जवळ भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , टेकाडी ग्रामपंचायत सरपंच विनोद इवनाते , डॉ.आयुषी डंभारे , डॉ.माधुरी चेरेकर , डॉ .किर्ती , सह्याद्री संस्थेचे डी आर पी नितेश नागदेवे सह आदि मान्यवरांचा हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपीता महात्मा गांधी , माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . शिबीरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय नागपुर , माधवबाग हाॅस्पीटल , एबीओ आई इंस्टीट्यूट , लता मंगेशकर हाॅस्पीटल येथील डाॅक्टर आणि चंमुच्या सहकार्याने एकुण २०६ नागरिकांच्या जनरल चेकअप , ईसीजी , एक्स-रे , बीपी , शुगर , दातांचे चेकअप , डोळे चेकअप , एच.आय.व्ही , एस.टी.आय आणि टी.बी चेकअप सह आदि विविध आरोग्याची तपासणी करण्यात आली . शिबीर कार्यक्रमात पारशिवनी ग्रामीण रुग्णालयाच्या कौन्सिलर सुवर्णा गिरी , टीबी डिपार्टमेंट रंजु घोडमारे , आरोग्य सहायक हंसराज ढोके , आरोग्य सेवक श्रावण इंगळे , सेविक नितु गायधने , आशा वर्कर आरती सिंग , सरस्वती पाल , दुर्गा वाघमारे , बिंदु साहानी , किरण बिंझाडे , रुपेश सहारे , मृणाली मुळे , सामाजिक कार्यकर्ता राम दुलारे राम बदन जयस्वाल सह आदि नागरिक उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , जया हिवसे , लोकेश दमाहे , पायल मेश्राम , साहिल सैय्यद , अभिषेक साखरे , निखिल मेश्राम , कैप्टन सतीश बेलसरे , अर्जुन पात्रे , शुभम बावनकर , रुजल मेश्राम , अभय ऊके , माहेर इंचुलकर , प्रदीप बावने , राजकुमार पटले , शैलेश झेंडे , सुरज वरखडे , हिमांशु सावरकर , मुकुल शिवरकर , सुशिल ठाकरे , राजेश मेश्राम , ऋषी देशमुख , सौरभ गावंडे सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या