कन्हान : - मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांचा अवमानाचा निषेधार्थ कन्हान , कांद्री परिसरितील शैकडो सेवक , सेविकांनी कुलदीप मंगल कार्यालय येथुन कन्हान पोलीस स्टेशन पर्यंत बाबा जुमदेवजी यांच्या घोषणा देत शांति पूर्ण मोर्चा काढुन अवमान करणाऱ्या मुकेश प्रकाश सावरबांधे यांचा विरुद्ध कठोर कारवाई ची निवेदन देऊन मागणी केली आहे .
सोमवार (दि.२९) सप्टेंबर रोजी रात्री ११:१४ वाजता च्या दरम्यान गैरअर्जदार कु.मुकेश कुमार सावरबांधे मो.नंबर ९३५९२९०७८१ रा.बाम्हणी , तालुक.पवनी , जिल्हा भंडारा या तरुणाने आपल्या मोबाईल वर व्हाट्सएप स्टेट्स ला परम पूज्य परमात्मा एक मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांचा व्हिडियो बनवुन त्यांचाबद्दद्दल अश्लील भाषेत शिवीगाळ करुन त्यांचा अपमान केला . बाबा जुमदेव यांचा अपमान केल्यामुळे कन्हान , कांद्री परिसरितील शैकडो सेवक , सेविकांच्या भावना दुखवल्या आहेत .
या घटनेचा निषेधार्थ गुरुवार (दि.९) आॅक्टोंबर रोजी शैकडो सेवक , सेविकांनी परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत कन्हान , कंद्री , खंडाळा , जुनिकामठी , अजनी परिसरातील मार्गदर्शक अशोक मानकर यांच्या नेतृत्वात कुलदीप मंगल कार्यालय येथुन कन्हान पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला .
कन्हान पोलीस स्टेशन मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन मुकेश प्रकाश सावरबांधे यांचा विरुद्ध कठोर कारवाई ची मागणी केली आहे .
या प्रसंगी मार्गदर्शक अशोक मानकर , संभाजी मस्के , नारायणराव मांडलेकर , शालिक सहारे , शंकर राऊत , गंगाराम मरबते , शंकर लेंडे , अरुण हटवार , दौलत बर्वे , सेवाकरम चौधरी , लीलाधर कुंभलकर , वसंतराव लोहकरे , गणेश सरोदे , दिपक कुंभलकर , प्रवीण बावणकुळे , सारंग काळे , अजय मांडरे , संजय चौधरी , कृष्णा चौधरी , यशवंत आंबिलधुके , जयंत कुंभलकर , विलास वाडीभस्मे , रवी राणे , विष्णू गाढवे , गज्जू गोरले , प्रभाकर समरित , श्यामराव बावनकुळे , प्रकाश भोयर , नामदेव कामडे , सोनू बर्वे , सेविका सौ.रश्मी बर्वे , वर्षा मानकर , कल्पना कुंभलकर , सत्यफुला गाते , सुनदा राऊत , संगीत वांढरे , निर्मला मेश्राम , तुळसाबाई मस्के , मालू आकरे , दुर्गा सरोदे सह आदि शेकडो सेवक आणि सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
Protest against the great martyr Baba Jumdevji by holding a protest march
Protest-against-the-great-martyr-Baba-Jumdevji-by-holding-a-protest-march
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या