Advertisement

कु.जिया कांबळेचा श्री. संताजी अखिल भारतीय तेली समाज कन्हान शहर द्वारे सत्कार | Ku. Jia Kamble felicitated by Shri. Santaji Akhil Bharatiya Teli Samaj Kanhan City


कु.जिया कांबळेचा श्री. संताजी अखिल भारतीय तेली समाज कन्हान शहर द्वारे सत्कार

कन्हान : - रायपूर येथे झालेल्या कुराश खेळातील राष्ट्रीय चैंपियनशिप स्पर्धेत गोल्ड , पदक  पटकवणारी खेळाडू कु.जिया अविनाश कांबळे चा श्री.संताजी अखिल भारतीय तेली समाज कन्हान शहर द्वारे वृक्ष देऊन सत्कार व अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यकारिता शुभेच्छा दिल्या .

रायपुर येथे संपन्न राष्ट्रीय कुराश स्पर्धा सबजुनियर चैपिंयनशिप २०२५-२६ या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या खेळाडुंनी महाराष्ट्र व नागपुर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व क्रिडा प्रशिक्षक अमितकुमार ठाकुर सर यांच्या मार्गदर्शनात करून बिहार , पंजाब व हरियाणा येथील खेळाडुशी लढत देऊन विजय श्री खेचुन आणत घवघवीत यश संपादित केले . यात कु.जिया अविनाश कांबळे इयत्ता ९ वी हिने २८ किलो वजन गटात स्वर्ण  पदक पटकावुन विजयी होऊन शाळेचे व कन्हान - कांद्री शहराचे देशात नाव लौकिक केले . 

टेकाडी येथे रविवार (दि.२३) सप्टेंबर रोजी श्री.संत संताजी अखिल भारतीय तेली समाज संघटन कन्हान शहर द्वारे विजेत्या विद्यार्थी खेडाळुंचे भव्य स्वागत करून गुलाबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला . या प्रसंगी जिल्हा ग्रामीण संर्पक प्रमुख सूर्यभान चकोले , कन्हान शहर अध्यक्ष व सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार सुनील सरोदे , कार्याध्यक्ष व पत्रकार ऋषभ बावनकर , उत्तमराव वाघमारे , राजेश लेंडे , जगदीश पोटभरे , मनोहर कोल्हे , अविनाश कांबळे , मनिषा कांबळे , पत्रकार किशोर वासाडे , कृष्णा कांबळे , विशाधर कांबळे सह नागरिकांनी उपस्थित राहुन विजयी विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार करुन अभिनंदन केले .

kumari Jia Kamble felicitated by Shri. Santaji Akhil Bharatiya Teli Samaj Kanhan City

kumari-Jia-Kamble-felicitated-by-Shri.-Santaji-Akhil-Bharatiya-Teli-Samaj-Kanhan-City

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या