"गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात बाप्पाला निरोप
ढिवर समाज सेवा संघटनेच्या जीवन रक्षक पथक द्वारे बप्पाचे नदी पात्रात विर्सजन
कन्हान नगर परिषद द्वारे कुत्रीम तलावाची व्यवस्था , पोलीसांचा चोख बंदोबस्त
नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची विर्सजन स्थळी भेट
कन्हान : - कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात जंगी मिरवणुक काढुन गुलाब पुष्पांची उधळण करीत कुत्रिम तलावात आणि नदी पात्रात विर्सजन करुन बाप्पाला भावपुर्ण निरोप देण्यात आला .
बुधवार दिनांक २६ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थी च्या दिवशी लाडक्या बाप्पांचे पारंपरिक पद्धतीने मिरवणुक काढुन सार्वजनिक आणि घरोघरी गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . सर्व कुटुंबे एकत्रित येऊन सतत रोज सकाळी आणि सायंकाळी आरती करुन भक्तीभावाने लाडक्या बाप्पांची पुजा अर्चना केली .सार्वजनिक ठिकाणी आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम , विविध स्पर्धा , भजन , कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले . त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते .
शनिवार (दि.६) रोजी अनंत चतुर्दशी च्या दिवशी सकाळपासुन गणेश भक्तांनी ढोलताशा , डिजेच्या निनादात व गुलाल उधळत विर्सजन मिरवणुक काढुन गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गणपती बाप्पाचे कुत्रिम तलावात आणि नदी पात्रात विर्सजन करुन बाप्पाला भावपुर्ण निरोप देण्यात आला .
विसर्जन स्थळी नगर परिषद कडुन योग्य व्यवस्था
कन्हान - पिपरी नगरपरिषद प्रशासना कडुन विसर्जन स्थळी योग्य व्यवस्था करण्यात आली होती . माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत कन्हान - पिपरी नगर परिषद द्वारे काली माता मंदिर घाट परिसर आणि नवीन नगर परिषद प्रांगणात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली . तसेच काली मंदिर परिसरात विद्युत रोषणाई , सीसीटीवी कैमरे , पिण्याचा पाण्याची व्यवस्था , निर्माल्य व्यवस्थापन , सुचना देण्यासाठी साऊंड सिस्टम ची व्यवस्था नगर परिषद प्रशासना कडुन करण्यात आली . ढिवर समाज सेवा संघटनेच्या जिवन रक्षक पथकाने कन्हान , पिपरी , कांद्री , टेकाडी सह ग्रामीण भागातील नारिकांच्या हजारोच्या संख्येत घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर घाटाच्या कन्हान नदी पात्रात आणि कुत्रिम तलावात शिस्तबध्य विर्सजन करून गणपती बाप्पाला आंनदाने शांततेत निरोप देण्यात आला .
विसर्जन स्थळी पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची भेट ,
नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी काली मंदिर परिसर विसर्जन स्थळी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला . तसेच अधिकार्यांना आवश्यक सुचना दिल्या .गणपती विर्सजन दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचीत घटना घडु नये म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला . राखीव दलाचे पथक तैनात करुन विशेष ठिकाणी फिक्स पाॅईंट लावण्यात आले .
अतिशय भावपूर्ण वातावरणात कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात गणपती विसर्जन सोहळा शांततेत पार पडला .
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर , मुख्याधिकारी दिपक घोडके , ढिवर समाज सेवा संघटनेचे रामटेक विधानसभा अध्यक्ष बालचंद्र बोंदरे , कन्हान शहर अध्यक्ष सुतेश मारबते , सचिव मनोज मेश्राम , कोषाध्यक्ष अॅड.श्रीकांत मानकर , सदस्या सौ.रेखा भोयर , सौ.कुंदा कांबळे , सह आदि पोलीस अधिकारी , नगर परिषद अधिकारी , कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या