Advertisement

अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडले


अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडले

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त , दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

महसुल विभाग आणि कन्हान पोलीसांची संयुक्त कारवाई 

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा रेती घाटातुन अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्राली ला महसुल विभाग आणि कन्हान पोलीसांच्या पथकाने पकडुन आरोपी मालकाला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ५,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मंगळवार (दि.९) सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता च्या दरम्यान पारशिवनी तहसील कार्यालय ग्राम महसुल अधिकारी महेंद्र पुरुषोत्तम क्षीरसागर , ग्राम महसुल अधिकारी कन्हान - पिपरी अनिकेत दिवटे , महसुल सहायक योगेश बर्वे , चालक मोहन हे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांचा आदेशाने भरारी पथक कामी कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत होते  . 

सिहोरा रेती घाटातुन अवैध वाळुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली . पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर , पोहवा अमित यादव , हरिष सोनभद्रे , अमोल नागरे , आकाश सिरसाट घटनास्थळी दाखल झाले . एमजी नगर कडुन सिहोरा कडे जात असतांना समोरुण एक ट्रॅक्टर येतांनी दिसला . 

कन्हान पोलीसांनी आणि महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबवण्याचा ईशारा केला . चालकाने रोडच्या कडेला ट्रॅक्टर उभा करुन अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला . ट्रॅक्टर जवळ जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ट्राॅली मध्ये एक ब्रास वाळु दिसुन आली . काही वेळाने एक इसम तेथे आला . अभिषेक ऊर्फ  हिमांशु येलमुले रा.पिपरी याला अधिकाऱ्यांनी विचारफुस केली असता त्याने ट्रॅक्टरचा मालक असल्याचे सांगितले . चालक आणि वाळु परवाना बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगितले . 

महसुल विभाग आणि कन्हान पोलीसांना अवैध वाळु वाहतुक करीत असल्याचा संशय झाल्याने पोलीसांनी मालक अभिषेक ऊर्फ हिमांशु येलमुले याला अटक करुन त्याचा जवळुन ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच ४० सी.एक्स.८१७८ आणि ट्राॅली क्रमांक एम एच ३८ ए.एल.३७७१ अंदाजे किंमत ५,००,००० रुपए , एक ब्रास रेती ५,५०० रुपए असा एकुण ५,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . 

या प्रकरणी ग्राम महसुल अधिकारी महेंद्र पुरुषोत्तम क्षीरसागर यांचा तक्रारी वरून पोलीसांनी आरोपी मालक अभिषेक ऊर्फ हिमांशु येलमुले आणि फरार आरोपी चालक रोशन सोमकुवर यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Tractor caught transporting illegal sand

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या