Advertisement

कायद्यामध्ये सुधारणा करून मराठा समाजा ला स्वतंत्र १०% आरक्षण द्यावे


कायद्यामध्ये सुधारणा करून मराठा समाजा ला स्वतंत्र १०% आरक्षण द्यावे 


कन्हान : -  श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर जि.नागपुर व्दारे मुख्याधिकारी दिपक घोडके नगरपरिषद कन्हान-पिपरी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र १० % आरक्षण देण्यात यावे‌ तथा सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये. हैद्राबाद गैझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर रद्द करण्यात यावा अशी निवेदनातुन मागणी करण्यात आली .


तो जी.आर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा तथा ओबीसी समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्यांसाठी आत्मघातकी असल्यांसारखा आहे . सात ते आठ कोटी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केले तर २७ % ओबीसी आरक्षण ते आता च्या परिस्थितीत ओबीसी समाजाला मिळणारे फक्त १९ % मिळते . 

त्यातही सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीचे आरक्षण नगण्य होऊन जाईल . ज्यामुळे ओबीसी प्रवर्गाची आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक , विकास मंदावेल . मराठ्यांचे आर्थिक मुल्यांकन होऊन ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही त्यांना कायद्यामध्ये सुधारणा करून स्वतंत्र १० % आरक्षण द्यावे . जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळावे . जर बिना आंदोलन करता सवर्ण समाजाला आरक्षण केंद्र शासन देऊ शकते . तर मराठ्यांना का बरं नाही. 

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे . जेणे करून ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होणार नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहरा व्दारे करण्यात आली आहे . 

तसेच सरकारने निवेदनाला सकारात्मक घेऊन योग्य तो मार्ग काढुन न्याय द्यावा. यावेळी निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो असे आश्वासन मुख्याधिकारी दिपक घोडके यांनी संघटनेला दिले . शिष्टमंडळात संपर्क प्रमुख नागपुर जिल्हा सुर्यभान चकोले , कन्हान शहराध्यक्ष  सुनिल सरोदे , कार्याध्यक्ष वृषभ बावनकर तथा पदाधिकारी विनोद किरपान , अविनाश कांबळे , चंद्रशेखर बावनकुळे, सचिन सरोदे , निर्णय कुंभलकर‌ , जंयत कुंभलकर , पंकज वंजारी , भगवान ला़ंजेवार , वामन देशमुख‌ आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या