Advertisement

आदर्श हायस्कुल येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा

आदर्श हायस्कुल येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा

नाटक , स्पर्धा आणि शिक्षकांचा सत्कार 

कन्हान : - आइडियल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श हायस्कुल कन्हान येथे दहावीच्या विद्यार्थांनी  मंगळवार रोजी शिक्षक दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले  . 

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष पुष्पा द्विवेदी , सचिव भरत सावळे , सहसचिव गीता मेश्राम , मुख्याध्यापक गीरजाशंकर यादव , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लता पेटकर सदस्या शिवम द्विवेदी , छाया मिसाल सह आदि मान्यवरांचा हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन आणि केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मान्यवरांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शिक्षक दिनगच्या शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमात दहाविच्या विद्यार्थांनी नाटक आणि शिक्षक , शिक्षिकांनी विविध खेळ स्पर्धा प्रस्तुत करुन उपस्थितांचे मन मोहित केले . विद्यार्थांनी शिक्षकांचा शाॅल आणि भेट वस्तु देऊन सत्कार करुन शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु.प्रीति सोनावने यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु.उजाला गौतम यांनी केले . कार्यक्रमात शिक्षक , शिक्षिका , कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या