विद्यार्थ्यांनो खा,प्या अन तंदुरुस्त रहा - डी शिवानंद
सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डी शिवानंद यांची धर्मराज शाळेला भेट.
चिमुकल्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे सत्कार.
कन्हान : - विद्यार्थ्यांनी शालेय वयात खूप खाऊन पिऊन तंदुरुस्त रहावे व अभ्यासाकडे नियमितपणे लक्ष द्यावे , असे मौलीक मार्गदर्शन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक मा. डी शिवानंद यांनी केले .
धर्मराज शैक्षणिक परिसरात सोमवार (दि.१५) सप्टेंबर रोजी त्यांनी धर्मराज प्राथमिक शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला . लहान मुलांमध्ये परमेश्वर असुन यांच्या आनंदात सहभागी होता येत असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले . धर्मराज प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हरिष पोटभरे उपस्थित होते . तर प्रमुख अतिथी म्हणुन रोटी फाऊंडेशनचे संस्थापक व सेवानिवृत्त पोलीस महासंचालक मा.डी शिवानंद उपस्थित होते .
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन रोटी फाऊंडेशनचे समन्वयक सी.एम बगारीया , संजय सरकार , संजय पन्नासे , मुख्याध्यापक खिमेश बढिये , पर्यवेक्षक राजुसिंग राठोड उपस्थित होते . यावेळी धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस महासंचालक मा.डी शिवानंद यांचा शाल , पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . मंचावरील सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी रोटी फाऊंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना चिक्की , कंपास बाॅक्स, बिस्किट चे वाटप करण्यात आले .
रोटी फाऊंडेशनच्या मदतीने गेल्या दोन वर्षां पासुन विद्यार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी प्रास्ताविकात नमुद करून रोटी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार यशपाल गंगराज यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भिमराव शिंदे मेश्राम , गणेश खोब्रागडे , यशपाल गंगराज , कु. शारदा समरीत , कु.अर्पणा बावनकुळे , कु पूजा धांडे , कु उत्तरा बन्सोड , माला मदनकर , सरीता बावनकुळे , सुषमा आरेकर , संजय साखरकर यांनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या