Advertisement

सियामानस भजन मंडळ द्वारे भजन कीर्तन कार्यक्रम


सियामानस भजन मंडळ द्वारे भजन कीर्तन कार्यक्रम

कन्हान : - कांद्री परिसरात गणेशोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे . या  पार्श्वभूमीवर सियामानस भजन मंडळ द्वारे बजरंगी युवा प्रतिष्ठान,लहान हनुमान मंदिर,वार्ड क्रमांक दोन कांद्री येथे भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . 



महिलांनी गणेश मुर्तीची विधिवत पूजा अर्चना आरती करुन भजन कीर्तनाची सुरवात केली . विविध भजन कीर्तन करुन महिलांनी परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले . कपुर गौरम आरती करुन आणि प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता केली . या प्रसंगी उज्वला पोटभरे , मनिषा वाढीभस्मे , नलू पोटभरे , रेखा कामडे , रुपाली आकरे , मुन्नीबाई यादव , माधुरी चकोले , माधुरी विश्वकर्मा , रोहिणी पोटभरे , शशिकला गायकवाड , रजनी चकोले , जयश्री पोटभरे , वैशाली कामडे सह आदि नागरिक उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या