घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत बक्षीषाचा वर्षाव
ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठाण घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ चे दुसऱ्या वर्षी आयोजन
कन्हान : - श्री गणेश भक्तांचा आनंद द्विगुणीत व्हावा , त्यांच्या भक्तीमय सजावटीच्या कला कौशल सुप्त गुणास प्रोत्साहन मिळावे म्हणुन ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान द्वारे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ चे दुसऱ्या वर्षी आयोजन केले . बुधवार (दि.१०) सप्टेंबर रोजी बालक उत्कृष्ट हस्त मुर्ति कलेचे पाच बक्षीष गणपती उत्कृष्ट सजावट , हस्तकला , प्रेजेंटेशन असे प्रत्येकी तीन प्रमाणे नऊ आणि सहभागी ३०० भक्तांना प्रोत्साहन पर बक्षीष वितरण करण्यात आल्याने जणु बक्षीषाचा वर्षावच करून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीष वितरण सोहळा थाटात साजरा करण्यात आला .
घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन कन्हान - पिपरी नगरपरिषद क्षेत्रात करण्यात आले असुन प्रभाग क्र.१ ते १० मध्ये सोमवार (दि.०१) ते शुक्रवार (दि.०५) सप्टेंबर २०२५ पर्यंत रोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजे पर्यंत निरिक्षण चंमुनी घरगुती श्री गणेश मुर्ती सजावटीचे चित्रीकरण व निरिक्षण केले . यात ३५० घरगुती श्री गणेश भक्त सहभागी झाले . परिक्षकांनी गणेश मुर्ती सजावटीचे चित्रीकरणावरून परिक्षण करित विजयी भक्तांची निवड करून बुधवार (दि.१०) सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विवेकानंद नगर कन्हान येथे संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत प्रमुख अतिथी डॉ.मंगतानी , डॉ. श्रीकृष्ण जामोदकर , हिराबाई शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे , जेष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी , मा. मधुकर नागपुरे , लताताई वंजारी आदि मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करित श्री गणेश आरती करून बक्षिस वितरण सोहळयाची सुरूवात करण्यात आली .
सर्व प्रथम बालक उत्कृष्ट हस्त निर्मित मुर्तिकलेचे १) कु. डिम्पल ढगे शिवनगर ,२) कु. चंचल खंडेलवाल हनुमान नगर , ३) सारांश तितरमारे विवेकानंद नगर , ४) कु.सिद्धी पांडे शिवनगर , ५) देवांश श्रीवास्तव शिवनगर , कन्हान या मुलांना मान्यवरा़ंच्या हस्ते बक्षीष देऊन गौरविण्यात आले . त्यानंतर तीनसे सहभागी श्री गणेश भक्तांना प्रोत्सानपर बक्षीष देऊन शेवटी गणपती उत्कृष्ट सजावट करिता प्रथम हरिनारायण पाली शिवनगर , द्वितीय राकेश भरणे विवेकानंद नगर , तृतीय आस्तिक चिंचुलकर शिवनगर , उत्कृष्ट हस्तकला सजावटी करिता प्रथम प्रमोद मदनकर शिवनगर , द्वितिय येसुदास चौहान विवेकानंद नगर , तृतीय कु.तनु संजय मसार पिपरी , उत्कृष्ट प्रेजेंटेशन व सजावट करिता प्रथम दिलीप सोनवणे राधाकृष्ण नगर , द्वितीय देशमुख गुरुजी इंदिरानगर , तृतिय. प्रतिक जाधव विवेकानंद नगर कन्हान ह्याना मान्यवरांच्या हस्ते " गणपती बाप्पा मौरया , मंगल मुर्ती मौरया" च्या जयघोष आणि टाळयाच्या गजरात बक्षीष वितरण करण्यात आल्याने जणु बक्षीषाचा वर्षावच करून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीष वितरण सोहळा थाटात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र चकोले यांनी केले आणि तर आभार प्रदर्शन मोतीराम रहाटे यानी मानले .
घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धे च्या यशस्वितेकरिता आयोजक ग्रामोन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान अध्यक्ष आणि माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव , ताराचंद निबाळकर , मधुकर नागपुरे , मोतीराम रहाटे , अजय भोस्कर , विजय पारधी , रवि रंग , सचिन साळवी , रुपेश सातपुते , हबीब शेख , प्रविण गोडे , महेंद्र भुरे , पुरुषोत्तम येणेकर , राजेश गणोरकर , दिलीप राईकवार , गणेश खांडेकर , शांताराम जळते , अशोक हिंगणकर , कमलेश पांजरे , प्रदीप वानखेडे , चंद्रशेखर कळमदार , कमलसिंग यादव , सुनिल सरोदे , आकाश पंडीतकर , विठ्ठल मानकर , राजु नागपुरे , गोविंद जुनघरे , प्रशांत येलकर , इंदल यादव , माधव काठोके , मोहन भोयर , चिंटु वाकुडकर , सुतेश मारबते , रंगराव काकडे , नेवालाल पात्रे , केतन भिवगडे , देवा चतुर , बाल्या खंगार , अशोक मेश्राम , निशांत जाधव , संतोष गिरी , प्रविण माधवे , संजय हावरे , किशोर नांदुरकर , दिपक उघडे , राकेश घोडमारे , आशिष नागपुरे , दामोधर बोकडे , आयुष भोगे , तेजस लोडेकर , संकल्प भोगे , राकेश आदीनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या