Advertisement

सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्यावर पोलीसांची धाड


सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्यावर पोलीसांची धाड

दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

कन्हान : - कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाने आंबेडकर चौक येथे एस.बी.आई एटीएम च्या मागे सुरु असलेल्या सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्यावर पोलीसांनी धाड टाकुन ११,२८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

गुरुवार (दि.११) सप्टेबंर रोजी सायंकाळ च्या दरम्यान कन्हान पोलीस डीबी पथक पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना आंबेडकर चौक येथे एस.बी.आई एटीएम च्या मागे सट्टापट्टी जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली . 

या आधारे पोलीसांनी सापळा रचुन धाड टाकली असता आरोपी सौरभ पंजाब वासे (२६ वर्ष) रा.कन्हान हा लोकां कडुन पैसे घेऊन कागदावर सट्टापट्टीचे आकडे घेतांना दिसुन आला . पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता नगदी १२८० रुपए , अॅनड्राईड मोबाइल किंमत १०,००० रुपए , पेन ५ रुपए असा एकुण ११,२८५ रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला . 

विचारफुस केली असता आरोपी ने मयुर हटवार रा.घोरपडे ले आऊट कन्हान यांचा सांगण्यावरुन ३०० रुपए रोजीने लिहतो असे सांगितले . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी सौरभ वासे आणि मयुर हटवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात , पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , पोहवा हरिष सोनभद्रे , जीवन विघे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

Police raid on betting parlor gambler

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या