जीएसटीचे दोनच स्लैब: जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होऊन आम जनतेला मोठा फायदा
नवा जीएसटी सुधारणा विधेयक सामान्य माणसाला दिलासा देईल: कुंभारे
पुढाकार प्रतिनिधि अशोक काळबांडे
केंद्र सरकारने नुकताच नवा जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर केला आहे. खऱ्या अर्थाने हा एक क्रांतीकारी निर्णय असेल, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळेल. कारण, जीएसटीचे दोनच स्लैब ठेवल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होऊन आम जनतेला मोठा फायदा होईल. हे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सावनेर येथील पामकोर्ट लॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी मुख्य संघटक धनराम देवके, आदर्श पाटले, जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, जिल्हा महासचिव दिनेश ठाकरे, जिल्हा समन्वयक उज्ज्वला बोधारे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष ज्योती - कांबळे, सावनेर मंडल अध्यक्ष मंदार मांगले, सह-संयोजक जीएसटी प्रतीक कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुंभारे म्हणाले की, केंद्र सरकारने २०१७ मध्ये देशात जीएसटी कर प्रणाली लागू केली होती. त्यावेळी जीएसटीमध्ये ५, १२, १८ आणि २८ टक्के असे ४ स्लैब (कर दर) ठेवण्यात आले होते. परंतु आता सरकारने मोठा निर्णय घेत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) स्लैबमधील १२ आणि २८ टक्के स्लैब कमी केले आहेत. आता बहुतेक वस्तूंसाठी केवळ ५ आणि १८ टक्के असे दोनच स्लैब ठेवण्यात आले आहेत.
या नवीन कर प्रणालीमुळे वस्तू आणि सेवांचे वर्गीकरण सोपे होईल. निश्चितच आवश्यक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर घेऊन जातील. नवे जीएसटी सुधारणा शेतकरी आणि सामान्य माणसासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतील.
शेतकऱ्यांनाही लाभ:
शेतकऱ्यांनी वापरलेल्या शेतीउपयोगी काही साहित्य आणि उपकरणांवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल. यामुळे त्यांची उत्पादन लागत कमी होईल आणि नफा वाढवण्याची संधी मिळेल. सामान स्वस्त झाल्याने बाजारात मागणी वाढेल आणि विक्री वाढून कृषी उत्पादनांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.
या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि मध्यमवर्गीय लोकांचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरील विश्वास अधिक मजबूत झाला आहे, असे कुंभारे यांनी सांगितले.
Only two slabs of GST: The prices of essential commodities will come down, bringing great benefits to the common people.
पुढाकार समाचार प्रतिनिधि- अशोक काळबांडे -सावनेर
0 टिप्पण्या