Advertisement

साधनाताई आमटे अंगणवाडी येथे पोषण जागरुकता कार्यक्रम संपन्न


साधनाताई आमटे अंगणवाडी येथे पोषण जागरुकता कार्यक्रम संपन्न 

कन्हान : - कांद्री एकात्मिक बाल विकास सेवा योजना साधनाताई आमटे अंगणवाडी क्रमांक १५८ येथे गुरुवार रोजी पोषण अभियान जन आंदोलन अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता वामन देशमुख , प्रकल्प अधिकारी पारशिवनी किशोर खेडकर , पर्यवेक्षिका अश्विनी ऊईके , कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा शहाणे , जेष्ठ अंगणवाडी सेविका शेशीकला बागडे सह आदि मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मान्यवरांनी पोषण आहार बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले  . 

मुलांमधील आणि महिलांमधील कुपोषण कमी करणे , गर्भवती आणि स्तनदा मातांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी प्रयत्न करणे , स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांमधून पौष्टिक आहार कसा मिळवावा ,  याबद्दल जागरूकता निर्माण करणे , सकस आहार , निरोगी खाण्याच्या सवयी आणि आरोग्यविषयक पद्धतींना प्रोत्साहन देणे . अशी या कार्यक्रमाची उदिष्टे होती .


अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना व महिलांना पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि ते कसे मिळवावे, हे समजावून सांगितले . ०-६ वर्षांची मुले, गर्भवती आणि स्तनदा माता यांना आवश्यक असलेले कॅलरीज आणि प्रथिने देणारा पूरक पोषण आहार पुरवला जातो . असे ही मान्यवरांनी आपल्या संबोधनातुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . परिसरात षोषण जागरूकता रैली काढुन नागरिकांना पोषण आणि आरोग्याचे महत्व पटवुन सांगितले . कार्यक्रमात पोषण आहार प्रदर्शन करण्यात आले . 
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनिषा वासनिक आणि आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका मिना पोटभरे यांनी केले . या प्रसंगी सेविका रेखा मस्के , मंगला कामडे , शोभा सरोदे , लक्ष्मी देशमुख , सुनिता मारबते , प्रभा कारामोरे , पुष्पलता राऊत , सविता बावनकुळे , सुलताना बानो , सुमित्रा वैध , प्रतिषा सुकदेवे , प्रतिभा डोरले , सत्यफुला आष्टनकर सह आदि सेविका , मदतनीस , आशा वर्कर , गरोदर माता ,स्तनदा माता प्रामुख्याने उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या