Advertisement

महाकाली मंदीरात घट स्थापना करून नवरात्रौत्सवाचा शुभरंभ


महाकाली मंदीरात घट स्थापना करून नवरात्रौत्सवाचा शुभरंभ


कन्हान : - नागपुर जिल्हयातील पावन कन्हान नदी च्या काठावरील प्रसिध्द 'क' तिर्थ क्षेत्र असलेले ॐ महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे ॐ महाकाली सेवा समिती कन्हान - सत्रापुर व्दारे घट स्थापना करून नवरात्रौत्सवाचा शुभारंभ करण्यात आला .


दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शूक्रवार (दि.२६) सप्टेंबर २०२५ अश्विन शुल्क चतुर्थी ला सकाळी ९ वाजता ॐ महाकाली सेवा समिती कन्हान - सत्रापुर व्दारे कन्हान नदीच्या काठावरील प्रसिध्द ॐ महाकाली मंदीरात मा.सनदजी गुप्ता यांचे हस्ते विधिवत पुजा अर्चना करून घट स्थापना करून नवरात्र उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . याप्रसंगी मंदीराचे महाराज उत्तमराव दुरूगकर आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते . 

नव दिवस पुजा , अर्चना , सकाळ , सायंकाळ आरती आणि भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून शनिवार (दि.४) ऑक्टोबंर अश्विन शुल्क १२ ला सकाळी ८.३० वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन आणि महाप्रसाद वितरण करून नवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे . करिता जिल्हयातील सर्व भाविक भक्त मंडळींनी निर्धारित वेळेस उपस्थिती राहुन ॐ महाकाली मातेच्या दर्शनाचा तसेच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा . असे आवाहन ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर चे सचिव मा. प्रकाश कडु हयानी केले आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या