महानिर्मिती कडून आंदोलकांच्या मागण्या मान्य
तीन दिवसात घाटरोहना वासियांच्या आंदोलानाला यश , सोळा युवकांना रोजगार उपलब्ध
कन्हान : - महानिर्मिती द्वारा घाटरोहना गावालागत कोळसा वाहून नेण्यासाठी कनव्हेयर बेल्ट उभारलेला आहे . जिथे शासन निर्णयानुसार ८०% स्थानिकांना रोजगार देणे अनिवार्य असतांना रोजगारापासुन वंचित ठेवण्याच काम महानिर्मिती कडून सुरु होते . या विरोधात दिनांक बुधवार (दि.२४) सप्टेंबर पासून सरपंच किशोर बेहूणे यांनी बेमुदत कनव्हेयर बेल्ट येथील काम थांबवून ठिय्या आंदोनाला सुरवात केली होती . अखेरे तिसऱ्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि स्थानीय १६ युवकांना रोजगार देण्याच्या मागण्या महावितरण कडुन मान्य करण्यात आल्या . ज्यातील अत्यंत गरजवंत आठ युवकांना तात्काळ स्वरूपात रुजू करण्यात आल्याने राजकीय सहकार्य शिवाय उभारलेलं आंदोलन यशस्वी करण्या ग्रामस्थांना यश आले . कनव्हेयरबेल्ट प्रकल्प उभारणीवेळी घाटरोहन येथील युवकांना रोजगार देण्याची लिखित आश्वासण देण्यात आले होते .
मात्र असे होताना दिसतं नसल्याने सरपंच किशोर बेहूणे , उपसरपंच अशोक पाटील , माजी उपसरपंच तेजराम सरिले यांच्या नेतृत्वात बुधवार (दि.२४) सप्टेंबर पासून कनव्हेयर बेल्ट येथील काम थांबवून बेमुदत ठिय्या आंदोनाला ग्रामस्थांनी पुकारले होते . सलग तीन दिवस शांततेत आंदोलन सुरु असतांना शुक्रवार (दि.२६) सप्टेंबर रोजी प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने आंदोलन दडपण्याचे काम हाती घेतले होते .
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड हे दंगा नियंत्रण पथकासह आंदोलन स्थळी दाखल झाले असताना आंदोलक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्यात बराच वेळ शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली ज्यानंतर गावातील महिला , मुलं , वयस्क सगळे आंदोलन स्थळी दाखल झाले होते . शर्ते शेवटी महानिर्मिती कडून चर्चेसाठी शिष्टमंडळाला बोलविण्यात आले होते .
खापरखेडा येथे महानिर्मितीचे मुख्य अभियंता गिरीश कुमलवार यांच्या दालनात तहसीलदार तहसीलदार सुरेश वाघचौरे , पोलीस निरीक्षक वैजंती मांडवधरे यांच्या उपस्थितीत सरपंच किशोर बेहूने , उपसरपंच अशोक पाटील , माजी उपसरपंच तेजराम सरिले , टेकाडी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड या शिष्टमंडळा सोबत तीन तास यशस्वी चर्चा झाली .
त्यानंतर मुख्य अभियंता गिरीश कुमलवार यांनी तात्काळ स्वरूपात कंत्राट पद्धतीने आठ युवकांना तसेच प्रकल्प सुरळीत सुरु होताच महिनाभरात उर्वरित आठ युवकांना रोजगार देण्याचे लिखित स्वरूपात दिले . त्यानंतर तहसीलदार यांनी आंदोलन माघारी घेण्याची विनंती केली .
सरपंच किशोर बेहूणे यांनी फोन वर ग्रामस्थांना मागण्या मान्य झाल्याचे सांगून आंदोलन माघारी घेण्याच्या सूचना केल्या . आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सरपंच किशोर बेहूणे , उपसरपंच अशोकजी पाटील , माजी सरपंच तेजराम सारिले , माजी सरपंच दिगांबर ठाकरे , सदस्य राजकुमार बावणे , शशिकला सोनवाणे , सुनीता तांडेकर , रीना पाटील , सुरज पाटील , हुकूम सुर्यवंशी , नत्थू शिन्देकर , शामजी वाटकर , मोतीलाल बेहूणे , अमित छानीकर , जंगुल शेन्डे , संजय छानीकर , सिद्दार्थ पाटील यांच्या सह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते .
दडपशाही खपवून घेतली जाणार नाही - माजी अध्यक्ष रश्मी बर्वे
आंदोलनाला दडपशाहीने उधळून लावत असल्याचे कळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी आंदोलकांची भेट घेत पोलीस प्रशासनाला स्थानिकांच्या मागण्या हक्काच्या आहेत त्यांच्यावर दडपशाही खपवून घेतली जाणार नाही अश्या शब्दात खडेबोले सुनवले . गोंडेगाव सरपंच मनीषा दलाल यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविलेला होता .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या