Advertisement

कन्हान शहर विकास मंच द्वारे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार


कन्हान शहर विकास मंच द्वारे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार

कन्हान : - कन्हान शहर विकास मंच द्वारे भारताचे पहिले उपराष्ट्रपति , दुसरे राष्ट्रपति तत्वज्ञ आणि राजकारणी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा १३७ व्या जयंतीचे औचित्य साधुन शिक्षक दिवस कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले .


कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी दखने हायस्कुल, कन्हान च्या माजी मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके , प्रमुख पाहुणे बळीरामजी दखने हायस्कुल, कन्हान चे माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव , माजी उपमुख्याध्यापक एकनाथ खर्चे , आदर्श हायस्कुल, कन्हान चे माजी मुख्याध्यापक राजेंद्र गोंड , सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक शांताराम जळते , केंद्र प्रमुख वामन पाहुणे सह आदि मान्यवरांचा हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन सत्कार सोहळा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 


यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके , माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव , माजी मुख्याध्यापक राजेंद्र गोंड ,  माजी मुख्याध्यापक शांताराम जळते , माजी उपमुख्याध्यापक एकनाथ खर्चे , आदर्श हायस्कुल कन्हान चे मुख्याध्यापक गीरजाशंकर यादव , बळीरामजी दखने हायस्कुल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत , केंद्र प्रमुख वामन पाहुणे , शिक्षक मोतीराम रहाटे , देवेंद्र सेंगर , शशीकांत बोंदरे , जेष्ठ पत्रकार कमलसिंग यादव यांचा शहर विकास मंच च्या सदस्यांनी शाॅल आणि वृक्ष देऊन सत्कार केला . 

मान्यवरांनी शिक्षक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन उपस्थित शिक्षकांना शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले . राष्ट्रगीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन सदस्य अर्जुन पात्रे यांनी केले आणि आभार प्रदर्शन महिला सदस्य जया हिवसे यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , हिमांशु सावरकर , अर्जुन पात्रे , सौरभ गावंडे , साहिल सैय्यद , माहेर इंचुलकर , प्रणय लंगडे , जया हिवसे , पायल मेश्राम , नाना ऊकेकर , शुभम बावनकर सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या