अज्ञात वाहनाच्या धडकेत गौवंशाचा मृत्यु
कन्हान : - कन्हान शहरातील नागपुर - जबलपुर महामार्गा वरील जे.एन हॉस्पिटल कांद्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गौवंशाचा मृत्यु झाल्याने गौसेवा समिती कन्हान क्षेत्राच्या युवकांनी मातीत दफन करुन वाहिली श्रद्धांजली अर्पण केली .
शुक्रवार (दि.२६) सप्टेंबर रोजी रात्री च्या दरम्यान जे.एन हॉस्पिटल समोर अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन गौवंशाला जोरदार धडक दिली , या धडकेत गौवंश गंभीर जख्मी झाल्याने स्थानिक तरुणांनी घटनेची माहिती गौसेवा समिती कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर यांना दिली . त्यांनी
सदस्य आयुष संतापे यांचा सोबत घटनास्थळी पोहोचले . गौवंश गंभीर जख्मी अवस्थेत आढळून आल्याने शुभम बावनकर यांनी घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास पुंडे यांना दिली . त्यांनी घटनास्थळी पोहोचून योग्य उपचार केला . गोवंश मालक यांनी दुर्लक्ष करुन योग्य व्यवस्था केली नाही आणि रात्रभर पावसात राहुन जास्त त्रास वाढल्याने शनिवार रोजी दुपारी तिचा मृत्यु झाला .
गौसेवा समिती कन्हानच्या तरुणांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन जेसीबीच्या साहाय्याने गड्डा करून माती देऊन पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . यावेळी गौसेवा समिती कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर , सदस्य सुजित सावरकर , ओम हजारे , राहुल कश्यप भैया , श्रेयस झिंगरे , आयुष संतापे , अंकुश दुबे , रोहित कनोजिया सह आदि नागरिक उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या