Advertisement

गांजा बाळगुण विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल


गांजा बाळगुण विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान : - कन्हान शहरातील राॅयनगर परिसरातुन गांजा विक्री करणाऱ्या आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाने ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन १६,८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे .

बुधवार (दि.२४) सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक कन्हान परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन राॅयनगर परिसरात अवैध गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली . 

पोलीसांनी घटनास्थळी जावुन सापळा रचुन आरोपी अजय भाऊराव पडघाने (वय ३९) रा.पटेल नगर, कन्हान याला ताब्यात घेऊन त्याची राॅयनगर येथील गायीच्या गोठ्याची झडती घेतली असता ३४० ग्राॅम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळुन आला . 

पोलीसांनी आरोपी ला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन १६,८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी अजय पडघाने याचा विरुद्ध एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या