Advertisement

ब्रेकींग न्यूज़ धरणाचे दरवाजे सुरुच , कन्हान नदीच्या पाणी पातळीत वाढ


ब्रेकींग न्यूज़ धरणाचे दरवाजे सुरुच , कन्हान नदीच्या पाणी पातळीत वाढ


नदी काठावरील गावांना सर्तकतेचा ईशारा


कन्हान : - तोतलाडोह आणि नवेगांव खैरी पेंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने आणि मध्यप्रदेशील चौराई धरणाचे दरवाजे उघडल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे .मंगळवार पासुन तोतलाडोह आणि नवेगांव खैरी पेंच धरणाचे धरणाचे दरवाजे सुरुच असल्याने कन्हान नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .


नागपुर जिल्ह्यासह , पारशिवनी , रामटेक तालुक्यात मागील काही दिवसान अधुन मधुन  जोरदार पाऊस सुरु आहे . तोतलाडोह आणि नवेगांव खैरी पेंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा दमदार पाऊस झाल्याने आणि मध्यप्रदेशील चौराई धरणाचे दरवाजे उघडल्याने तोतलाडोह आणि पेंच धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे . धरण सुस्थितीत राखण्याकरिता आणि परिस्थिति नियंत्रणा करिता मंगळवार पासुन तोतलाडोह आणि पेंच धरणाचे दरवाजे उघडल्याने  कन्हान नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असुन नदी दुधळी भरुन वाहत आहे . धरणाचे दरवाजे सुरुच असुन नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे नदी काठावरील गावांना आणि नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी नदी पात्रात जाण्याचे टाळावे असे कडकडीचे आव्हाहन तोतलाडोह धरण अधिकारी देवेंद्र महादुले , नवेगांव खैरी पेंच जलाशय शाखा अधिकारी सुमित लोखंडे यांनी केले आहे .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या