Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत गौवंश गंभीर जख्मी , उपचारा करिता रवाना

अज्ञात वाहनाच्या धडकेत गौवंश गंभीर जख्मी , उपचारा करिता रवाना

गौवंश सेवा समिती कन्हान क्षेत्र यांचे सेवाभावी कार्य

कन्हान : - कन्हान शहरातील नागपुर जबलपुर महामार्गा वर अज्ञात वाहनाच्या धडकेत गौवंश गंभीर जख्मी झाल्याने गौवंश सेवा समिती कन्हान क्षेत्राच्या युवकांनी पुढाकार घेऊन तिला
प्राणी रूग्णवाहिकेच्या मदतीने उपचारा कामी जैन गौशाला काटोल रोड नागपुर येथे पाठविण्यात आले .
बुधवार (दि.२७) आॅगस्ट रोजी नागपुर जबलपुर महामार्गा वर अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन गौवंश ला जोरदार धडक दिली . धडकेत गौवंश खाली रस्त्यावर पडुन गंभीर जख्मी झाली .

 रज्जन सिंग यांनी खदान नंबर ६ येथे आपल्या निवास्थानी नेऊन गौवंशाचे उपचार केले . परंतु प्रकृती स्थिर येत नसल्याने त्यांनी घटनेची माहिती सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष आणि गौवंश समिति कन्हान क्षेत्राचे शहर प्रमुख शुभम बावनकर यांना दिली . त्यांनी वेदांत बावनकुळे यांना सोबत घेऊन खदान नंबर ६ येथे जाऊन पाहणी केली असता त्यांना गौवंश गंभीर जख्मी अवस्थेत आढळून आली . 

शुभम बावनकर यांनी घटनेची माहिती गौसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष साई कनोजिया यांना दिली असता त्यांनी जैन गौशाला येथे संपर्क केला . शनिवार (दि.३०) आॅगस्ट रोजी जख्मी गौवंशाला प्राणी रूग्णवाहिकेच्या मदतीने उपचारा कामी जैन गौशाला काटोल रोड नागपुर येथे पाठविण्यात आले . या प्रसंगी गौसेवा समिती चे संस्थापक प्रमुख अध्यक्ष साई कनोजिया , सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष आणि गौसेवा समिती कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर , उपप्रमुख हिमांशू सावरकर , सदस्य वेदांत बावनकुळे , राजू डोरसेटवार , रज्जन सिंग , आणि इतर नागरिक उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या