Advertisement

राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पदक विजेत्या विद्यार्थी खेडाळु चे जंगी स्वागत |


राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पदक विजेत्या विद्यार्थी खेडाळु चे जंगी स्वागत


कन्हान : -  रायपुर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धा सबजुनियर चैम्पियनशिप २०२५ -२६ या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या खेळाडुंनी दोन स्वर्ण व दोन कास्य पदक पटकावित आई , वडीलांचे , बीकेसीपी शाळा आणि कन्हान - कांद्री शहराचे नावलैकिक केल्याने विजयी विद्यार्थी खेडाळु आणि क्रिडा प्रशिक्षकाचे शीतला माता मंदीर कमेटी , भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ता व्दारे स्वागत करून भव्य सत्कार करण्यात आला .

रायपुर येथे संपन्न राष्ट्रीय कुराश स्पर्धा सबजुनियर चैम्पियनशिप २०२५-२६ या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या खेळाडुंनी महाराष्ट्र व नागपुर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व क्रिडा प्रशिक्षक अमितकुमार ठाकुर सर यांच्या मार्गदर्शनात करून बिहार , पंजाब व हरियाणा येथील खेळाडुशी लढत देऊन विजय श्री खेचुन आणत घवघवीत यश संपादित केले . यात १) कु. वैष्णवी रविंद्र कोतपल्लिवार इयत्ता ७ वी हिने -३२ किलो. वजन गटत स्वर्ण पदक पटकाविले. २) कु.जिया अविनाश कांबळे इयत्ता ९ वी हिने - २८ किलो वजन गटात स्वर्ण पदक , ३) कु.लावण्या प्रविण होले इयत्ता ९ वी हिने - ४८ वजन गटात कास्य पदक , ४) वेदांत विष्णु कुथे इयत्ता ८ वी याने - ३० वजन गटात कास्य पदक पटकावुन विजयी होऊन शाळेचे व कन्हान- कांद्री शहराचे देशात नाव लौकिक केले .  शहरात आगमन होताच जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री कन्हान येथे रविवार (दि.१५) सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शीतला माता मंदीर कमेटी व्दारे क्रिडा प्रशिक्षक अमितकुमार ठाकुर सर सह विजेत्या विद्यार्थी खेळाडुंचे भव्य स्वागत करून पुष्पहार , शाल , श्रीफळाने सत्कार करण्यात आला . त्यानंतर वाजत गाजत मिरवणुकीसह कु.वैष्णवी रविंद्र कोतपल्लिवार च्या घरी पोहचुन तिथे ही औषवंत व मिठाई खाऊ घालुन स्वागत करण्यात आले . भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .


या प्रसंगी संजय चौकसे , वामण देशमुख , महेश मंगतानी , पारस मरघडे , चंद्रशेखर बावनकुळे , प्रकाश ढोके , वसंता राऊत , गोकुल पटेल , प्रेमचंद चव्हाण , चंद्रशेखर कळमदार , ओमदास लाडे , रोहित वासनिक , भुमीपुत्र युवा प्रतिष्ठान उपाध्यक्ष अतुल हजारे , शिवाजी चकोले , नंदुजी पोटभरे , गुरुदेव चकोले , सौरभ पोटभरे , हर्षल सीरिया , विजय पोटभरे , ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे , युवा पत्रकार ऋषभ बावनकर, किशोर वासाडे , शुभम बावनकर , पालक रविंद्र कोतपल्लिवार , अजय ठाकरे , प्रविण होले , अविनाश कांबळे , दिनेश खाडे , विष्णु कुथे , सुभाष मदनकर , शारिक अंसारी , राज झुनझुनकर , हर्षल बढेल , महिला अरुणा हजारे , सुनंदा कोतपल्लीवार , आरती कोतल्लीवार , मनिषा कांबळे क्रिडा शिक्षिका रेणु राऊत सह नागरिकांनी उपस्थित राहुन विजयी विद्यार्थी खेळाडुंचे स्वागत केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या