Advertisement

कन्हान शहर विकास मंच द्वारे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले

कन्हान शहर विकास मंच द्वारे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले

कन्हान : - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधुन कन्हान शहर विकास मंच द्वारे कन्हान , कांद्री परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले . 
संताजी नगर क्रांद्री येथे मंच चे नवनिर्वाचित सदस्य सतीश बेलसरे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महामानव क्रांतीसुर्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण अभिवादन करुन  कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र्यावर व माजी नगरसेविका राखी परते यांनी जागतिक आदिवासी दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा आवार संताजी नगर कांद्री , हनुमान नगर समाज भवन , कन्हान पोलीस स्टेशन परिसर , प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले  . मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

 या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे डॉ.आयुषी डंभारे , माजी नगरसेविका राखी परते , कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , साहिल सैय्यद , धीरज सोलंकी , नाना ऊकेकर , शुभम बावनकर , सतीश बेलसरे , अभिषेक साखरे , निखिल मेश्राम , आयुष संतापे , प्रल्हाद कुंभरे  , राजु उमाळे , निशा उके , अभय उके , रुजलं मेश्राम सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या