Advertisement

ओबींसीच्या जागरासाठी " मंडल यात्रा " भाजप च्या बालेकिल्ल्यातुन शरद पवारांची फिल्डिंग | Sharad Pawar's fielding from BJP stronghold "Mandal Yatra" for the awakening of OBCs

ओबींसीच्या जागरासाठी " मंडल यात्रा " भाजप च्या बालेकिल्ल्यातुन शरद पवारांची फिल्डिंग

नागपुर येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

कन्हान : -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिमो मा.शरदचंद्र पवार चा नेतृत्वात शनिवार (दि.९) आॅगस्ट रोजी होणाऱ्या मंडल यात्रेला नागपुर जिल्हा शहर व ग्रामिण कमेटी यांची आढावा बैठक संपन्न झाली .

सन १९९० वर्षी माजी पंतप्रधान वी.पी सिंग यांनी मंडल कमिशन आयोगा लागु केला होता . ज्या मध्ये ओबीसी बॅकलॉग जो संविधानात तरतुद असुन काँग्रेस च्या शासनकाळात तो पूर्ण केला नव्हता , तो बॅकलॉग १९९० वर्षी वी.पी सिंग ने लागु केला . त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्र पावर यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात लागु केला . या निर्णयाचा पूरजोर विरोध भाजप ने देशात कमंडल यात्रा काढुन ओबीसी लोकांना एक भ्रामक प्रचार ओबीसी आरक्षणाचा केला होता . ओबीसी आरक्षण सामाजिक न्याय आणि प्रगतीला कमंडल यात्रे पासुन तर आज पर्यंत भाजपा ने भ्रामक प्रचार करून ओबीसी विरोधात जे काम करत आहे , त्याला तोडगा देण्याकरिता ओबीसी हितासाठी या ऐतिहासिक घटनेला लढलेल्या लढवया मा.शरदचंद पवार स्मरण करत राजव्यापी यात्रा सुरू करित आहे . या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालय नागपुर येथे एक जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली . ज्यामध्ये नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेचे नियोजन व आयोजनावर चर्चा करण्यात आली . सोबतच स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्शभूमीवर भाजपा ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या विरोधात कसे वापरणार अशा विविध दृष्टिकोनातुन ओबीसी जिल्हा प्रतिनिधी मंडळा ने सखोल चर्चकारून जनजागृती केली आणि कार्यकर्त्यांना दिशा निर्देश देण्यात आले . ही सभा शनिवार (दि.९) ऑगस्ट २०२५ रोजी ११ वाजता आशीर्वाद बँक्वेट हॉल व्हरायटी स्क्वेअर लता मंगेशकर हॉस्पिटल जवळ नागपुर येथे होणार आहे .

Sharad Pawar's fielding from BJP stronghold "Mandal Yatra" for the awakening of OBCs

आढावा बैठकीस माजी गृहमंत्री मा.अनिलबाबु देशमुख , माजी आमदार रमेशचंद्रजी बंग , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये , माजी आमदार प्रकाश गजभिये , माजी आमदार विजय घोडमारे , जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे , नागपुर अध्यक्ष प्रविण कुंटे पाटील , प्रदेश प्रवक्ता शब्बीर विद्रोही , महिला जिल्हाध्यक्षा वैशाली टालाटुले आदी मान्यवर सह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या