विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलीस तैनाताची मागणी
मुख्याध्यापिका , शिक्षक आणि पालकांचे पोलीस विभागाला निवेदन
कन्हान : - बी.के.सी.पी शाळा सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत शाळेच्या गेटजवळ आणि महामार्गावर वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी शाळा व्यवस्थापकीय संचालिका , शिक्षकवृंद आणि पालकांनी कन्हान ठाणेदार यांना निवेदनातून केली आहे .
कन्हान शहरातील इंग्रजी माध्यमांची नावलौकिक असलेली बीकेसीपी शाळा गेल्या चाळीस वर्षापासून महामार्गांवर कळेला आहे .
या शाळेत सुमारे १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे . सकाळी शाळा सुरु होण्याचा आणि बंद होण्याचा वेळी शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची व विद्यार्थांची गर्दी होते . शिवाय शाळेला लागून नदीवर नवीन पूलाचा निर्माण कार्य झाले असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणांत सुरू असते .
शाळा सुटल्यावर विद्यार्थी सायकलने त्याच मार्गाने घरी जात असतात . अश्यावेळी मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही .
बीकेसीपी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ यांचा नेतृत्वात , शिक्षक आणि पालकांनी सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर यांची भेट घेऊन गंभीर विषयावर चर्चा केली आणि निवेदन देऊन
शाळा सुरु आणि बंद होण्याच्या वेळी शाळेच्या गेटजवळ आणि महामार्गावर वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी शिक्षक सनोज पनिकल, अमित ठाकुर , पालक लोकेश दमाहे , विजय गडे , नितिन अवस्थी , आनंद शर्मा , गजानन रहाटे , प्रशांत वाघमारे , हरिष तिडके , प्रशांत मसार , प्रदीप गायकवाड , गुड्डा सुर्यवंशी सह आदि पालकगण उपस्थित होते .
पोलीस विभागा कडुन निवेदनाची दखल
बीकेसीपी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ यांचा लेखी निवेदनाची कन्हान पोलीस विभागा कडुन दखल घेण्यात आली . सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर यांनी निवेदन घेतल्यानंतर वाहतुक कर्मचारी आकाश खोब्रागडे , सुरज कांबळे यांना आवश्यक सुचना दिल्या . वाहतुक पोलीसांनी शाळा सुटल्यावर महामार्गावर उभे राहुन वाहतुक सांभाळली . विद्यार्थांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि मोठा अपघात घडु नये या उद्देशाने पोलीसांनी कारवाई केली . दररोज शाळा सुटल्यावर वाहतुक पोलीस कर्मचारी महामार्गावर उभे राहुन विद्यार्थांना दिलास देणार काय? याकडे शिक्षकांचे , पालकांचे , लक्ष लागले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या