भाजपा जिल्हा मंत्री अतुल हजारे यांचे राज्यमंत्री जयस्वाल यांना निवेदन
कन्हान : - वेकोलिच्या कोळसा खाणीत कित्तेक खाजगी कंपन्या कार्यरत आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये परराज्यातून कामगार आणून त्यांचा कडून काम करून घेतेले जाते. अशा कामगारांना व्यक्तिशः पोलीस स्टेशन ला बोलून संपूर्ण चौकशी करण्याची मागणी भाजपा जिल्हा मंत्री अतुल हजारे यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन देऊन केली आहे .
निवेदन पत्रात सांगितले कि रामटेक विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कन्हान पोलीस स्टेशन येथे काही दिवसा पुर्वी भारतीय जनता पार्टीचेबूथ प्रमुख आणि पदाधिकारी महाराष्ट्र शासना द्वारे विशेष कार्यकारी अधिकारी (दंडाधिकारी) या पदाकरिता फॉर्म घेऊन संबंधित अधिकाऱ्यांतर्फे पूर्ण पडताळणी करून सही व शिक्का घेन्याकरिता गेले . त्यांची परस्पर व्यक्तिश बोलवून बसून योग्य रित्या पोलीस पडताळणी करण्यात आली आणि पूर्णत पडताळणी करून त्यांना मान्यता पोलीस पडताळणीची मान्यता देण्यात आली .
सध्या परिस्थितीत कन्हान परिसरात असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणीत कित्तेक खाजगी कंपन्या कार्यरत आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये परराज्यातून कामगार आणून त्यांचा कडून काम करून घेतेले जाते . वेकोलि कडून त्यांची पोलीस पडताळणी मागितली असता त्यांना पोलीस पडताळणी करून चारित्र्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येते . वेकोलिच्या अंतर्गत काम करणाऱ्या खाजगी कंपन्यांमध्ये उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश , छत्तीसगढ या राज्यामधील रहिवाशी कामगार कामावर घेतले जाते , यात कित्तेक कामगार हे कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगार आहेत ते इथलेच गुन्हेगार नसून त्यांच्या वर परराज्यात हि न्यायालयीन खटले सुरु आहेत. भाजपा नागपुर ग्रामीण जिल्हा मंत्री अतुल हजारे यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन देऊन
खाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची पोलीस पडताळणी करून चारित्र्य प्रमाणपत्र प्रदान करत असतांना अशा गुन्हेगार कामगारांना व्यक्तिश पोलीस स्टेशन ला बोलून संपूर्ण चौकशी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे . अशी मागणी केली आहे .
*राज्यमंत्री आशिष जयस्वाल कडुन निवेदनाची दखल , पोलीस अधिक्षकांना दिले आदेश*
रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाजपा नागपुर ग्रामीण जिल्हा मंत्री अतुल हजारे यांचा निवेदनाची दखल घेत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना पत्र पाठवुन योग्य कारवाई चे आदेश दिले आहे.
पत्रात सांगितले कि वेसर्टन कोलफिल्ड्स लिमीटेड मध्ये , मोठ्या प्रमाणात खाजगी कंपनी इगल इंफ्रा व हिलटॉप प्रा.ली. व अन्य खाजगी ट्रान्सपोर्ट कंपन्या मार्फत उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश , छत्तीसगढ , बिहार या परराज्यातील कामगार कामाला असून या कामगारांची आपल्या विभागामार्फत चारित्र पडताळणी करत असतांना कामगारांना प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहुन स्वतःची पडताळणी करणे अपेक्षित असतांना असे न करता गठ्ठा पद्धतीने अर्जावर कार्यवाही करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी आपण आतपर्यंत देण्यात आलेले चारित्र पडताळणी प्रमाणपत्रांचे व्यक्तीशह हजर करून रितसर चारित्र पडताळणी करण्यात यावे व तसे मला कळविण्यात यावे , असे ही आशिष जयस्वाल यांनी पत्रात नमुद केले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर*
0 टिप्पण्या